14 वर्षीय मुलीचे केस पकडून रात्री फरफटत नेण्याचा प्रकार: मुलीच्या ओरडण्याने लोक गोळा झाले, आरोपींनी पळ काढला


प्रतिनिधी | सोलापूर9 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

रात्री जेवण करून अंगणात थांबलेल्या १४ वर्षीय तरुणीचे केस पडकून फरफटत नेण्याचा प्रकार गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडला. आरोपीच्या दुसऱ्या हातात तलवार होती आणि त्याच्या साथीदाराने पीडितेचे दंड पकडले होते. तुझ्या वडिलांनी माझ्याकडून पैसे घेतले पण ते परत केले नाहीत. पैसे फिटेपर्यंत तू माझ्याबरोबर चल, असे म्हणत आरोपी अल्पवयीन पीडितेला जबरदस्तीने ओढून नेत होता. पीडितेच्या ओरडण्याने लोक गोळा झाले आणि पीडितेची सुटका झाली.

Advertisement

विजापूर नाका पोलिसांत नवनाथ पवार व पृथ्वीराज पवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नवनाथ याच्या हातात तलवार होती. तो पीडितेचे केस पकडून ओढत नेत होता. पीडितेचे ओरडणे ऐकून गल्लीतील लोक जमले. एकाने आरोपीची तलवार हिसकावून घेतली. पीडितेला सोडवले. लोकांची गर्दी पाहून दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला.Source link

Advertisement