नाशिकएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
पांजरपोळ येथे दाखल उंटाचे औक्षण करत शुक्रवारी (दि. १९) ५ रायकाच्या मदतीने राजस्थान येथे रवाना करण्यात आले. राजस्थान येथे उंट पाठवण्यापूर्वी सर्व उंटांची वैद्यकीय तपासणी करत लसीकरण देखील करण्यात आले. रायकासह उंट पायी राजस्थान येथे ३० ते ४० दिवसात पोहाेचणार असून त्यादृष्टीने नियाेजन करण्यात आले आहे.
कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशयावरून प्राणीमित्रांनी पुढाकार घेत शहरात ठिकठिकाणी आढळून आलेले १११ उंट पांजरपोळ येथे दाखल केले हाेते. पांजरपोळ येथे राेजच्या उंटांना पुरेशा आहार तसेच वैद्यकीय तपासणी देखील केली जात हाेती.मात्र कित्येक किलाेमीटरचा झालेला प्रवास, उंटाचे झालेले वय, आजार आदी कारणामुळे १११ उंटापैकी १३ उंटांचा मृत्यू झाला.
दरम्यान गुजरात येथील श्रीमद राजचंद्र मिशनच्या मदतीने राजस्थान येथील महावीर कॅमल सेन्चुरी या संस्थेने या सर्व उंटांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे. याच पार्श्वभुमीवर भिकाराम जक्ताजी, भलराम पुमाराम, करणाराम, हिराराम बुहराजी, अमरसिंग राठाेड, ज्याेतीराम ज्याेताजी,गणेश सवारामजी या रायकाच्या मदतीने शुकवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ९९ उंटांचा राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
उंटांचा प्रवास सुरु हाेण्यापूर्वी प्राणीमित्रासह महिलांनी त्याचे औक्षण करत सुखरुप प्रवाशांची प्रार्थना केली.तत्पूर्वी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गिरीश पाटील, डॉ. वैशाली थोरात, डॉ. साखरे आदींनी या सर्व उंटांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच ज्या उंटांना आवश्यक वाटले त्यांना लसीकरण देखील करण्यात आले. नाशिकहून वणी-बाेरगाव-सापूतारा मार्ग धरमपूर असा पहिल्या टप्प्यातील प्रवास असणार आहे. शहरातून हे सर्व उंट पोलिस बंदाेबस्ता रवाना करण्यात आले.
३० ते ४० दिवसांत हे उंट राजस्थान येथे पोहचतील. दररोज ते २० ते २५ किलाेमीटर पायी प्रवास करतील. रस्त्यातच त्यांची खाण्यापिण्याची सोय केली जाणार आहे.
पशूसंवर्धन विभाग अलर्ट माेडवर
राजस्थानच्या दिशेने निघालेल्या उंटांच्या प्रकृतीच्या दृष्टीने देखील पशूसंवर्धन विभाग अलर्ट माेडवर आहे. पायी जाणाऱ्या उंटांना काेणताही प्रकारचा वैद्यकीय त्रास झाला तर त्यादृष्टीने उपचारा उपलब्ध करुन देण्याेत येणार आहे.
दाेन रायका मालेगाव येेथून घेवून जाणार उंट
मालेगाव येथे देखील ४२ उंट दाखल करण्यात आलेले आहे. हे सर्व उंट देखील २ रायकाच्या वतीने मालेगाव येथून घेवून जाणार आहे.
टप्पाटप्याने प्रवास करत गाठवणार राजस्थान
”नाशिकमधील ९९ तर मालेगाव येथील ४२ उंट रायकाच्या मदतीने टप्याटप्याने प्रवास करत राजस्थान गाठणार आहे.नाशिकमध्ये या सर्व उंटांची येाग्य काळजी घेण्यात आली, लसीकरण करण्यात आले.” – अमरसिंग राठाेड, रायका