छत्रपती संभाजीनगर6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
लिटिल फ्लावर हायस्कूल छावणी इंग्रजी माध्यम येथील परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांच्या पेपरवर रंग उडाल्याने उत्तरपत्रिका 9 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांवर शिंतोडे उडून काही पाने खराब झाल्याचा प्रकार सोमावारी इंग्रजीच्या पेपरवेळी घडला. या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये. यासाठी आता त्यांचे क्रमांक बोर्डाला कळवण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेस 2 मार्च पासून सुरुवात झाली आहे. सोमवारी इंग्रजी भाषा विषयाचा पेपर 11 ते 2 यावेळेत होता. शहरातील छावणी परिरसरात असलेल्या लिटिल फ्लावर परीक्षा केंद्राच्या आवारात काहीजण रंग खेळत होते. होळी खेळत असतांना कुणीतरी रंगीत पाण्याचे फुगे वर फेकले परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर जावून आदल्याने रंगांचे शिंतोडे विद्यार्थ्यांच्या पेपरवर उडाल्याने उत्तरपत्रिका खराब झाली.
बोर्डाच्या नियमानुसार उत्तरपत्रिकेत खाडाखोड करणे, खुना करणे, नंबर लिहिणे आदी. हा गैर प्रकार मानला जातो. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होवू शकते. मात्र या प्रकारात विद्यार्थ्यांची काही चुक नाही. त्यामुळे आता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केंद्रास विद्यार्थ्यांचे क्रमांक बोर्डाला कळवून झालेल्या प्रकाराची माहिती देण्यास सांगितले आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
केंद्रावरील 9 मुलांच्या उत्तरपत्रिकेवर रंगाचे शिंतोडे उडाले आहेत. ही माहिती केंद्राने कळवली आहे. त्यावर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. यासाठी त्यांचे क्रमांक बोर्डाला कळवण्यात आले अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के.देशमुख यांनी दिली असून, मुलांचे कोणतेही नुकसान होणार नाही. असेही सांगितले.
4 कॉपी प्रकरण आढळून आले
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेला 2 मार्च पासून सुरुवात झाली. सोमवार दि. 6 मार्च रोजी दहावीचा इंग्रजी भाषा विषयाचा पेपर होता. या पेपरला एकूण 4 कॉपी प्रकरण आढळून आले आहेत. ज्यात औरंगाबाद 1, बीड 2 , जालना 1 असे एकूण 4 कॉपी केसेस आहेत. तर आतापर्यंत झालेल्या एकूण पेपरमध्ये विभागातील कॉपी केसेसची संख्या 97 झाली आहे. अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.