10 रुपये टाकताच स्वयंचलित मशीनमधून मिळेल कापडी पिशवी: नयी सुविधा स्वयंसेवी संस्थेचा अभिनव प्रकल्प


नागपूर40 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

बाजारात जाताना भाजीची पिशवी घरीच विसरली तर आता प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करू नका. नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने “नयी सुविधा” या स्वयंसेवी संस्थेतर्फे शहरातील बाजारांमध्ये स्वयंचलित कापडी पिशवी मशीन लावण्यात येत आहे.

Advertisement

मनपाच्या सीताबर्डी येथील सुपर मार्केटमध्ये संस्थेतर्फे पहिली मशीन लावण्यात आली असून मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी या मशीनच्या कार्यप्रणालीची पाहणी केली.

मनपा आयुक्तांचे आवाहन

Advertisement

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त विजय हुमने, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, बाजार अधीक्षक प्रमोद वानखेडे आदींची उपस्थिती होती. बर्डी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करावा आणि त्यांच्याकडे पिशवी नसेल तर या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

100 पिशव्यांची क्षमता

Advertisement

प्लास्टिक निर्मूलनाचा भाग म्हणून मनपाने बर्डी सुपर बाजारात कापडी पिशवी मिळण्याकरीता पहिली मशीन लावण्यात आलेली आहे. “नयी सुविधा” संस्थेचे अतुल पानट यांनी यावेळी मशीनची माहिती दिली. सीताबर्डी येथील मनपा सुपर मार्केटमध्ये लावलेल्या मशीनची 100 पिशवीची क्षमता आहे. 10 रुपयाचे नाणे किंवा नोट या मशीनमध्ये टाकल्यानंतर एक कापडी पिशवी मशीनमधून बाहेर येते. या पिशवीची क्षमता 10 किलो आहे.

मशीनच्या डिस्प्लेवर माहिती

Advertisement

विशेष म्हणजे मशीनमध्ये अद्ययावत सेंसर यंत्रणा असून याद्वारे पाच रुपयांचे दोन नाणे अशा स्वरूपात दहा रूपये टाकल्यानंतर पिशवी बाहेर येते. याशिवाय 10 रुपयांपेक्षा मोठ्या रक्कमेची नोट टाकल्यास तेवढ्या पिशव्या बाहेर येतात. मशीनमध्ये पिशव्या नसल्यास किंवा पुरेशे नाणे न टाकल्यास टाकलेले पैसे परत येतात. याशिवाय मशीनमध्ये पिशव्यांच्या उरलेल्या संख्येबाबत मशीनच्या डिस्प्लेवर याची माहिती येते.

प्लास्टिक बंदी अभियान

Advertisement

नागपूर महानगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी अभियानाचा एक भाग म्हणून नयी सुविधा संस्थेने पुढाकार घेतला आहे. कापडी पिशवी मशीनच्या माध्यमातून नागपूरकरांना प्लास्टिक पिशवीला पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मशीनचे तंत्रज्ञान बाहेरचे असले तरी यात बदल करून नागपूरमध्येच ही मशीन तयार केली असून पुढे इतर बाजारातही अशा मशीन लावण्यात येणार असल्याचे संस्थेचे अतुल पानट यांनी सांगितले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement