10 महिन्यांच्या लेकराला सोडून जाताना धाय मोकलून रडली सैनिक माता: कोल्हापूरच्या वर्षा पाटील यांनी दिले कर्तव्याला प्राधान्य, पाहा VIDEOकोल्हापूर7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आज आपल्याला प्रत्येक क्षेत्रात महिला दिसतात. संरक्षण क्षेत्रातही महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. भारतीय सीमासुरक्षा दलात ‘बीएसएफ’मध्ये जवान असलेल्या कोल्हापूरच्या वर्षा पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. आपल्या 10 महिन्यांच्या बाळाला सोडून सीमेवर जाणाऱ्या या आईने पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणले.

Advertisement

नोकरी करणाऱ्या महिलांना 8 तासांसाठी आपल्या बाळाला सोडून जाताना जीवाची अतिशय घालमेल होते. मात्र अनेक महिन्यांसाठी आपल्या काळजाच्या तुकड्यापासून लांब जाणाऱ्या मातेचे दुःख खूप मोठे होते. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळत आहे. ड्युटीवर परतणारे जवान आपण अनेकदा सिनेमांमधून पाहिले आहेत. मात्र या व्हिडिओमध्ये आई जवानाचे रुप मनाला चांगलेच स्पर्षून जाते.

निरोपाचा सोहळा

Advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथील वर्षा पाटील या भारतीय सीमासुरक्षा दलात बीएसएफमध्ये जवान आहेत. आपली वैद्यकीय सुट्टी संपवून त्या पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघाल्या होत्या. आपल्या दहा महिन्याच्या बाळाला घरी सोडून त्या जात होत्या. कुटुंबीयांकडून दिला जाणारा निरोपाचा सोहळा प्रत्येकाला गलबलून टाकतो.

सोशल मीडियात कौतुक

Advertisement

बाळाला आणि कुटुंबियांना सोडून जाताना वर्षा पाटील यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. त्या यावेळी धाय मोकलून रडत असल्याचे दिसून आले. मात्र एक आई असतानाही त्यांनी सर्वप्रथम भारतमातेच्या सुरक्षेला प्राधान्य देत लेकीचे कर्तव्य निभावले. त्यांचे सोशल मीडियात मोठे कौतुक होत आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement