छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत ६० ते ७७वयोगटातील २३ ज्येष्ठांनी सहभाग घेतला.प्रथम क्रमांक ७६ वर्षीय निर्मला मेहंदरगे यांनीपटकावला. त्यांनी जपानी युवती बनूनसर्वांना चकित केले, तर द्वितीय क्रमांक ६५वर्षीय विश्वास काळे यांनी कीर्तनकार बनून मिळवला.
प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्यावर्धापन दिनानिमित्ताने सिडको एन-५ येथीलगीता भवनात वेशभूषा स्पर्धा झाली.गतवर्षीच्या तुलनेत अधिक ज्येष्ठांनी सहभागनोंदवला. संस्थेचे अध्यक्ष भरत कुलकर्णी,सचिव श्रीकांत पत्की यांची उपस्थिती होती.वेशभूषा स्पर्धेत आनंदीबाई पेशवे, कृष्ण,राजस्थानी महिला, सुषमा स्वराज, जपानीयुवती, कीर्तनकार, सफाई कामवाली बाई,सुया-पोत विकणारी महिला, बहिणाबाई,तामिळी ब्राह्मण, पोस्टमन, काश्मिरी युवती,शेतकरी महिला, जनाबाई, सिंधुताई सपकाळअशा विविध वेशभूषा साकारण्यात आल्या.
तृतीय क्रमांक मनीषा एकबोटे (सफाई करणारीमहिला) यांना तर उत्तेजनार्थमध्ये रोहिणीकुलकर्णी (सिंधुताई सपकाळ), चित्रापिलखाने (घरातून हाकलून दिलेली महिला)यांची निवड करण्यात आली.