२०२२ आयपीएलच्या १५व्या हंगामात मोठे विघ्न, बीसीसीआयची चिंता वाढली

२०२२ आयपीएलच्या १५व्या हंगामात मोठे विघ्न, बीसीसीआयची चिंता वाढली
२०२२ आयपीएलच्या १५व्या हंगामात मोठे विघ्न, बीसीसीआयची चिंता वाढली

आयपीएलला आज सर्वात मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यामुळे आयपीएलचे भवितव्य पुन्हा एकदा अधांतरी होऊ शकते. त्यामुळे आता बीसीसीआयची चिंता पुन्हा एकदा वाढलेली आहे. कारण आता आयपीएलच्या स्पर्धेचे कायम होणार, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या चिंतेमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. आयपीएलने एक पत्रक काढून यावेळी या धक्क्याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता ही गोष्ट गंभीर असल्याचे सर्वांनाच समजले आहे.

आयपीएलला कोणता मोठा धक्का बसला, पाहा…

Advertisement

आयपीएल सुरक्षितपणे खेळवण्यात यावी, यासाठी बीसीसीआयने ही स्पर्धा एकाच राज्यात आयोजित केली आहे. पण तरीही आयपीएलच्या मार्गात विघ्नं थांबण्याचं नाव घेत नाही. आज आयपीएलला एक मोठा धक्का बसला आहे आणि त्यामुळे स्पर्धेवरही टांगती तलवार आली आहे. त्यामुळे आता यावर्षी आयपीएलचे काय होणार, ही चिंता चाहत्यांना सतावत आहे. आयपीएलने आज एक पत्रक काढलं आहे आणि त्यामध्ये ही धक्कादायक गोष्ट सांगण्यात आली आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ खेळत आहे. या दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील फिजिओ पॅट्रीक फरहात यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पॅट्रीक यांची चाचणी करण्यात आली आणि त्यामध्ये ते करोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यामुळे आता दिल्लीच्या संघात करोनाचा शिरकाव झाला आहे. गेल्यावर्षीची एका संघात करोनाचा शिरकाव झाला होता आणि त्यामुळे भारतामधील आयपीएल रद्द करून ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आली होती.

फरहात हे दिल्लीच्या संघाचे फिजिओ होते, त्यामुळे संघातील जवळपास सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकही त्यांच्या संपर्कात आले असतील. त्यामुळे आता करोनाची भिती दिल्लीच्या संघातील जववळपास सर्वच सदस्यांना असेल. त्यामुळे आता दिल्लीच्या संघातील सर्व सदस्यांना आता करोनाची चाचणी करावी लागणार आहे. त्यानंतर या चाचणीचा निकाल काय येतो, यावर आयपीएलचे भवितव्य अवलंबून असेल. कारण जर एका संघात करोनाचा शिरकाव झाला आणि त्यांना सामने खेळता येत नसतील तर बीसीसीआयला आयपीएलचे वेळापत्रक बदलावे लागेल. त्याचबरोबर करोनाचा शिरकाव फक्त दिल्लीच्या संघात झाला आहे का, हेदेखील बीसीसीआयचा चाचपडून पाहावे लागेल. त्यामुळे दिल्लीच्या संघातील कोणाला करोना झाला आहे का, हे पहिल्यांदा बीसीसीआयला पाहावे लागेल. त्यानंतर दिल्लीबरोबर कोणत्या संघाचा सामना झाला होता ते पाहून प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची चाचणी करावी लागेल. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी फक्त एका व्यक्तीमुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळत आहे.

Advertisement

चेन्नई आणि कोलकाता संघालाही मोठा धक्का

Advertisement

याव्यतिरिक्त आयपीएलच्या १५व्या हंगामातून आणखी एक महत्त्वाची बामती समोर येत आहे, ती म्हणजे चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर  हा स्पर्धेतून पाठीच्या दुखण्यामुळे बाहेर पडला आहे. तसेच, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा गोलंदाज रसिख सलाम हा देखील पाठीच्या दुखण्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या हंगामात त्याने कोलकाता संघाकडून २ सामनेही खेळले होते. अशात कोलकाता संघासाठी हा खूप मोठा धक्का आहे.

Advertisement