१००व्या सामन्यात लोकेश राहुलची मुंबई इंडियन्स विरुद्ध वादळी शतकी खेळी

१००व्या सामन्यात लोकेश राहुलची मुंबई इंडियन्स विरुद्ध वादळी शतकी खेळी
१००व्या सामन्यात लोकेश राहुलची मुंबई इंडियन्स विरुद्ध वादळी शतकी खेळी

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपरजायंट्स संघ शानदार प्रदर्शन करत आहे. त्यांनी आतापर्यंत हंगामातील ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. यादरम्यान कर्णधार राहुलची कामगिरीही प्रशंसनीय राहिली आहे. शनिवारी (१६ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध पुन्हा एकदा राहुलने त्याच्या बॅटचा करिष्मा दाखवला आणि खणखणीत शतक झळकावले आहे. हे आयपीएल २०२२ मधील दुसरे शतक आहे. शतकाच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने १९९ धावा केल्या. मुंबई इंडियन्स समोर २०० धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

विशेष म्हणजे, राहुलने १९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुंबईच्या टायमल मिल्सला जबरदस्त चौकार खेचत आपले शतक पूर्ण केले आहे. ५६ चेंडू खेळताना ५ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने त्याने शतकाला गवसणी घातली आहे. हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. त्यातही हा राहुलचा आयपीएलमधील १०० वा सामना होता आणि याच सामन्यात त्याने शतकी खेळी केल्यामुळे हे शतक त्याच्यासाठी अजून खास बनले आहे. तो १०० व्या आयपीएल सामन्यात शतक करणारा पहिलाच खेळाडू बनला आहे.

Advertisement

त्यापूर्वी सामन्यात नाणेफेक पार पडली असून मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून फॅबियन ऍलेनने मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले आहे. त्याला कायरन पोलार्डकडून मुंबईच्या पदार्पणाची कॅप प्रदान करण्यात आली. तसेच लखनऊ संघात एक बदल करण्यात आला असून मनिष पांडेला अंतिम ११ जणांमध्ये कृष्णप्पा गॉथमच्या जागेवर संधी मिळाली आहे.

Advertisement

या सामन्यातून मुंबईला हंगामातील पहिल्या विजयाची आस आहे. त्यांना यापूर्वी १५ व्या आयपीएल हंगामात खेळलेल्या पाचही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, लखनऊ संघही मुंबई संघासमोर मजबूत आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. लखनऊने आत्तापर्यंत पाच सामने खेळले असून तीन सामने जिंकले आहेत आणि दोन सामने पराभूत झाले आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, दुश्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई

Advertisement