होळीलाच दुर्दैवी घटना: बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटणाऱ्या भावाचा भरवस्तीत खून, नाशिकमधील धक्कादायक घटना


नाशिक24 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

एकीकडे होळीचा उत्साह अन् जल्लोष सुरु असताना नाशिक शहरात एक दुर्दैवी घटना घडली. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटणाऱ्या तरुणाचा भऱवस्तीत खून करण्यात आला. हा गंभीर प्रकार नाशिकमध्ये घडला. किरण गुंजाळ (वय 28, रा. नवनाथनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे.

Advertisement

संशयितांना अटक

शहरातील दिंडोरी नाका परिसरात खुनाची घटना घडली. यानंतर पोलिसांनी काही तासांतच संशयितांना अटक केली. तत्पूर्वी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच संशयितांचा पाठलाग केला होता पण, मात्र गर्दीतून संशयित पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध लावत बेड्या ठोकल्या.

Advertisement

भाजीपाला विक्रीचा होता व्यवसाय

नाशिक शहरातील दिंडोरी नाका भागात राहणाऱ्या किरण गुंजाळ (Kiran Gunjal) याची भाईगिरीतून सिनेस्टाईल पाठलाग करत धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून झाला. ही घटना सोमवारी घडली. किरण गुंजाळ हा गेल्या काही दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता.

Advertisement

असा झाला खून

किरण गुंजाळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पेठरोड येथून दुचाकीवरून जात असतांना तीन ते चार संशयितांनी पाठलाग सुरू केला. त्यानंतर गुंजाळ याने त्याची दुचाकी पेठफाटा येथे सोडून दिंडोरी नाक्याकडे पळ काढला. मात्र संशयित मारेकऱ्यांनी त्याला दिंडोरी नाक्यावर गाठत त्याच्या छातीत आणि पोटावरही धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किरण गुंजाळ याच्या गळ्यावर संशयितांनी पुन्हा वार केला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत गुंजाळ मृत झाला होता.

Advertisement

या संशयितांना पकडले

खुनानंतर पंचवटी पोलिसांनी दोन तासांत संशयितांना अटक केली. यात नितीन पांडुरंग साबळे, देवा उत्तम पाटील, दिपक रामान्ना ताब्यात घेतले आहे. किरण गुंजाळ आणि संशयितांमध्ये भाजी मार्केटमध्ये काम करीत असताना किरकोळ वाद चालू होते. सोमवारी सायंकाळी देखील किरकोळ वाद झाला. यात संशयितांनी किरण याच्यावर चाकूने गळ्यावर व पोटात वार करून खून करून पळ काढला.

Advertisement

आठवड्यावर होते बहिणीचे लग्न

मृत किरण गुंजाळ याच्या बहिणीचा येत्या सोमवारी विवाह असून तो सकाळपासून लग्न पत्रिका वाटप करीत होता. सोमवारी सायंकाळी तो लग्न पत्रिका वाटप करण्यासाठी जात असतांनाच संशयित मारेकऱ्यांनी त्याला गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात किरणचा मृत्यू झाला.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement