हैदराबादच्या ताफ्यातील केन विलियम्सन मायदेशी गेल्याने झाली मोठी गडबड, पर्यायी कर्णधाराचा शोध…

हैदराबादच्या ताफ्यात केन विलियम्सन मायदेशी गेल्याने झाली मोठी गडबड, पर्यायी कर्णधाराचा शोध...
हैदराबादच्या ताफ्यात केन विलियम्सन मायदेशी गेल्याने झाली मोठी गडबड, पर्यायी कर्णधाराचा शोध...

केन दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी न्यूझीलंडला परत जातोय. यामुळेच तो रविवारी वानखेडे मैदानावर होणाऱ्या पंजाब किंग्जविरुद्धची अखेरची साखळी लढत खेळू शकणार नाही. मुंबईवरील विजयामुळे हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्याप शिल्लक आहेत. पण त्यासाठी त्यांना अखेरची साखळी लढत जिंकावी लागेल आणि त्याच बरोबर अन्य संघांचे निकाल काय लागतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मोक्याच्या क्षणी तो संघाला अलविदा करून मायदेशी परतणार आहे. पण आता प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी हैदराबादच्या संघाचे कर्णधारपद कोणाला द्यायचे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण हैदराबादच्या संघापुढे आता दोन पर्याय उपलब्ध असल्याचे दिसत आहे. हैदराबादच्या प्लेऑफच्या आशा जिवंत हैदराबादने या आयपीएल हंगामात आत्तापर्यंत १३ सामने खेळले असून त्यातील ६ सामने जिंकले आहेत आणि ७ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे सध्या १२ गुण असून ते -०.२३० च्या नेटरनरेटसह गुणतालिकेत ८ व्या क्रमांकावर आहेत. हैदराबादला आता अखेरचा साखळी सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. प्लेऑफच्या दृष्टीने हैदराबादसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या सामन्याआधी होणाऱ्या अन्य संघांच्या सामन्यावरही हैदराबादच्या प्लेऑफची गणिते अवलंबून आहेत.

पहिला पर्याय

Advertisement

विल्यम्सननंतर जर हैदराबादच्या संघात कोणी खेळाडू असेल तर तो आहे भुवनेश्वर कुमार. भुवीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर त्याने हैदराबादचे हंगामी कर्णधारपदही भूषवले आहे. एका खेळाडू म्हणूनही भुवीची कामगिरी दमदार होत आहे. हैदराबादच्या संघाने मुंबईवर जो विजय साकारला त्यामध्ये भुवीचा मोठा वाटा होता. कारण भुवीने १९व्या षटकात विकेट मिळवली आणि धावा ही न देता त्याने मुंबईकडून सामना हिरावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सध्याच्या घडीला भुवी चांगल्या फॉर्मात आहे आणि जर त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले तर त्याचा फायदा नक्कीच हैदराबादला होऊ शकतो. त्यामुळे भुवी हा कर्णधारपदासाठी चांगला पर्याय असल्याचे दिसत आहे.

दुसरा पर्याय

Advertisement

जर हैदराबादला भुवीवर जास्त दडपण आणायचे नसेल तर आणि त्यांना जर विदेशी कर्णधारच हवा असेल तर त्यांच्याकडे निकेलस पुरनचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. पुरनकडे वेस्ट इंडिजच्या संघाचेही कर्णधारपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर पुरनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. फलंदाजीमध्येही पुरन चांगली चमक दाखवत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पुरनने दमदार फलंदाजी केली होती आणि राहुल त्रिपाठीला सुयोग्य साथ देत ७८ धावांची भागीदारीही रचली होती. या भागीदारीमुळेच हैदराबादच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली होती. त्यामुळे पुरन हा चांगली फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळ पुरनदेखील कर्णधाराचा चांगला पर्याय हैदराबादसाठी ठरू शकतो. हैदराबादच्या संघाकडे सध्याच्या घडीला भुवी आणि पुरन हे दोन पर्याय आहेत. त्यामुळे आता या दोघांपैकी कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात येते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

Advertisement