हे लाचामृत नकाे: अमृता फडणवीसांना 1 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत गाैप्यस्फाेट​​​​​​​


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Attempt To Pay Bribe Of 1 Crore To Amrita Fadnavis, Home Minister Devendra Fadnavis Disappeared In The Legislative Assembly​​​​​​

मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक
  • फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानीसह भावाला अटक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी अनिक्षा जयसिंघानी या फॅशन डिझायनरला अटक केली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत मुद्दा उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर निवेदन केले. अनिक्षा हिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्यावर १४-१५ खटले प्रलंबित असून वडिलांना वाचवण्यासाठी तिने अमृता फडणवीस यांच्याशी मैत्री केली होती. अमृतावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्यासाठी प्रयत्न झाला. पहिल्यांदा पैसे ऑफर करण्यात आले. त्यानंतर ब्लॅकमेल करण्यात आले, असे फडणवीस यांनी सांगितले. अनिक्षाच्या वाईट हेतूचा संशय आल्यानंतर अमृता हिने वडिलांच्या निर्दोषत्वाची पोलिसात तक्रार करण्यास अनिक्षाला सुचवले. यानंतर तिने अनिक्षाचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. मात्र त्यानंतर त्यांनी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू केला होता असे फडणवीस यांनी सांगितले.

Advertisement

मुंबईच्या एका पोलिस आयुक्ताचेही नाव जयसिंघानी यांची सुटका करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू झाली होती. त्यादरम्यान गृहविभागात यासंदर्भात काही नोटिंगही झाल्या आहेत. अनिक्षाने विधानात अनेक बड्या नेत्यांशी संपर्क असल्याची माहिती दिली आहे. त्यात मुंबईच्या एका पोलीस आयुक्ताचेही नाव समोर आले आहे. यामागे कारस्थानामागे कोण-कोण आहेत हे याची माहिती हाती येत नाही, तोपर्यंत बोलणार नाही. आरोपत्रात खूप काही समोर येईल. काही फॉरेन्सिक रिपोर्ट आलेत. सर्व काही बाहेर येईल. कोणाताही पुरावा हाती आला की नाव घेईन, असे फडणवीस यांनी सांगितले. बुकींच्या ठिकाणांवर छापे टाकून पैसे कमावण्याचीही ऑफर अनिक्षाने अमृता फडणवीस यांना सांगितले होते की, तिचे वडील अनिल जयसिंघानी हे अनेक बुकींना ओळखतात. या सट्टेबाजांचा ठावठिकाणा ते पोलिसांना सांगायचे व छापे टाकल्यावर पोलिस त्यांना पैसे द्यायचे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना अशाच प्रकारे बुकींच्या अड्ड्यांवर छापे टाकून पैसे कमावण्याची ऑफर दिली होती. पण अमृताने ही ऑफर नाकारली आणि संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अनिक्षा पैसे भरतानाची व्हिडिओ क्लिप
अमृता यांच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञात क्रमांकावरून काही व्हिडिओ क्लिप आणि फोटो आले होते. यातील एका बॅगेत अनिक्षा पैसे भरताना दिसत आहे आणि नंतर ती अशीच एक बॅग अमृता फडणवीस यांच्या मोलकरणीला देताना दिसते. अमृता यांनी या संपूर्ण घटनेची माहिती देवेंद्र फडणवीस यांना दिली आणि त्यानंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

अनिल जयसिंघानी फरार, आणखी काही लोकांची नावे समोर येण्याची शक्यता
अनिक्षा व तिचा भाऊ अक्षन यांना पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केली. तिचे वडील अनिल जयसिंघानी अद्याप फरार आहे. एफआयआर नोंदवल्याची माहिती लीक झाली नसती, तर या संपूर्ण प्रकरणात आणखी कोण-कोण सामील आहेत त्याची माहितीही समोर आली असती,असे फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement