हेरगिरी प्रकरण: डॉ. प्रदीप कुरुलकरांवर यूएपीए कलमानुसार कारवाईची संभाजी ब्रिगेड, आझाद समाज पक्षाची मागणी


पुणे31 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचा शास्त्रज्ञ प्रदीप एम. कुरुलकर याला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअ‌ॅप मेसेज, व्हॉईस कॉल्स आणि व्हिडीओद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आयचा हेर असल्याबद्दल आणि क्षेपणास्त्रांसंबंधी अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती शत्रूराष्ट्राला पुरवल्याबद्दल पुणे एटीएसने अटक केली आहे. त्यांच्यावर यूएपीए कलमानुसार कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेड आणि आझाद समाज पक्ष यांची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

याबाबत ॲड. तोसिफ शेख म्हणाले, देशाची इतर संबंधित गुप्त आणि संवेदनशील माहिती संशयित आरोपीने डिप्लोमॅटिक पासपोर्टवर काही परदेश दौरेही केले होते, ज्याची अधिक माहिती आता तपासली जात आहे. परंतु, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की, देशामध्ये बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) अधिनियम १९६७ तसेच देशद्रोह कलम १२४ (अ) भा. द.वी. १८६० व राष्ट्रीय तपास अधिनियम २००८ अस्तित्वात असताना पुणे एटीएसने केवळ अधिकृत गुप्तता कायदा, १९२३ च्या कलमांचा वापर केला आहे.

जेव्हा हे स्पष्ट आहे की, आरोपीने देशविघातक, देशद्रोही व दहशतवादी कृत्य केले आहे म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तपास आवश्यक आहे, ज्यासाठी राष्ट्रीय तपास एजन्सी [एन आय ए] ही मुख्य तपस यंत्रणा असून त्या संस्थेशिवाय अश्या गंभीर गुन्ह्याचा तपास इतर कोणतीही तपास यंत्रणा योग्य पद्धतीने करेल असे वाटत नाही.त्यामुळे राष्ट्रहिताच्या दृष्टीने विनंती करण्यात येते की आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, १९६७ ची कलमे व देशद्रोह कलम १२४ (अ) भा. द. वी. १८६० तात्काळ लावून हा तपास एन. आय. ए. कडे हस्तांतरित करण्यात यावा जेणेकरुन आरोपीच्या कृत्यांचा धोका असल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तपास करता येईल.

Advertisement



Source link

Advertisement