नाशिक2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या तब्बल तेरा खेळाडूंची रोइंग, कबड्डी, बास्केटबॉल, ॲथलेटिक्स स्पर्धांसाठी निवड झाली. रोईंग स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या अनिकेत तांबे, गणेश माळी, ओंकार राऊत,रोशन तांबे या खेळाडूंनी रौप्य व कांस्यपदक, ॲथलेटिक्समध्ये ट्रिपलजंप मध्ये पुनाजी चौधरी याने रौप्य पदक, सौरभ मोरे याने लांब उडीमध्ये कांस्यपदक तर कविता वडहिने स्टीपलचेसमध्ये कांस्यपदक संपादन केले.
कबड्डीमध्ये रितेश बिरारी याने नाशिक संघास कांस्यपदक मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. नुकत्याच पुण्यामध्ये पार पडलेल्या संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये 92 किलो वजन गटात महाविद्यालयाच्या बाळू बोडके याने कांस्यपदक संपादन केले. बाळू बोडके याने यापूर्वी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये 82 किलो वजन गटात दोन सुवर्णपदके संपादन केली आहेत.
तसेच नुकत्याच बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पर्धेत महाविद्यालयाच्या हर्षल ढाकणे या विद्यार्थिनीने मैदानी स्पर्धेमध्ये रौप्य पदक, पौर्णिमा शिंदे हिने कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक तर पुनाजी चौधरी याने ट्रिपल जंप मध्ये सुवर्ण पदक तर लांब उडीमध्ये कांस्यपदक संपादन करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले.b महाविद्यालयाच्या खेळाडूंनी संपादन केलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक मा. डॉ. अपूर्व हिरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या हस्ते सर्व पदक प्राप्त खेळाडूंचा स्पोर्ट्स किट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाच्या या सर्व पदक प्राप्त यशस्वी खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री प्रशांत दहिरे, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता हिरे, विश्वस्त संपदा हिरे, विश्वस्त डॉ. अद्वय हिरे (पाटील), महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. योगिता हिरे, व क्रीडा संचालक प्रा. डॉ. संतोष पवार, प्रा. किशोर राजगुरू यांनी अभिनंदन केले आहे.