हिंदु महासंघाचे आनंद दवे यांचा भाजपला सवाल: ईशान्य भारतात हिंदु विराेधी पक्षासाेबत जाऊन काय साधले?



पुणे15 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नुकत्याच पार पडलेल्या ईशान्य भारतातील तीन राज्यात भारतीय जनता पक्षाने यश संपादित केले. परंतु त्यानंतरही त्यांनी हिंदु विराेधी पक्षासाेबत जाऊन नेमके काय साधले आहे? असा प्रश्न उपस्थित करत हिंदु महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भाजपचे बेगडी प्रेम यानिमित्ताने पाहवयास मिळाल्याची खरमरीत टिका केली आहे.

Advertisement

गो-हत्या बंदीवर आता चर्चाच होणार नाही

आनंद दवे म्हणाले,मेघालय, नागालॅंड मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काेनराड संगमा यांना पाठिंबा देऊन गाेवा राज्याप्रमाणे आपला हिंदुत्ववाद हा गरजेनुसार असताे हे भाजपने सिद्ध केले आहे. आता त्या राज्यात समान नागरी कायदा किंवा गाे-हत्या बंदी कायदा सारखे विषय चर्चालाही येणार नाही. त्याठिकाणच्या हिंदुचे हाेत असलेले सक्तीचे धर्मांतर आणि त्यात मुख्यमंत्री संगमा यांच्या भूमिकेबाबतही आता चर्चा हाेऊ शकणार नाही.

Advertisement

ज्यांना दोष दिला त्यांच्यासोबत भाजपची सत्ता

आनंद दवे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर मेघालय, नागालँड राज्यातील हिंदूची संख्या निम्म्याने कमी झाली असून ख्रिस्ती समाजाकडून जाणीवपूर्वक धर्मांंतर केले जाते. यासाठी आजपर्यंत ज्यांना दाेष दिले आज त्यांच्याच बराेबर भाजप सत्तेत आहे. त्यामुळे भाजपची काँग्रेस हाेत असल्याचे देशभरातील नागरिकांना दिसून येत आहे.

Advertisement

भाजपचे बेगडी हिंदुत्व

आनंद दवे म्हणाले, संगमा यांनी सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने त्यांना पाठिंबा देण्याचे काेणते कारण नव्हते. हिंदुत्ववादी लाेक, संघटना यांच्या जखमेवर मीठ चाेळण्याचे काम भाजपने केलेले आहे. ज्या संगमा यांच्यावर भाजपने सातत्याने हिंदु अत्याचाराचे आराेप केले. ज्याठिकाणावरुन हिंदु संख्या लक्षणीयरित्या घटून किंवा स्थलांतर करुन दुसऱ्या राज्यात गेले त्याजागी संगमा यांना पाठिंबा देऊन भाजपने काय मिळवले आहे हे स्पष्ट करावे.

Advertisement

भाजपचे बेगडी हिंदुत्व

आनंद दवे म्हणाले, नागालँड, मिझाेराम, मेघालय मध्ये हिंदूची संख्या ४० टक्क्यापर्यंत कमी हाेऊन ख्रिश्चन संख्या वाढलेली आहे. त्यामुळे ख्रिश्चन धर्मांतर करणाऱ्यांसाेबत भाजप कशाकरिता गेली आहे. ख्रिस्ती समाजाची मते मिळविण्यासाठी भाजपचे बेगडी हिंदुत्व प्रेम आहे. छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे काैतुक असाे की उत्तर भारतात घेतलेले निर्णय पाहता भाजप हिंदुत्वाचे मुद्दयावर खाेटे पडत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement