हिंदकेसरी अभिजीत कटकेंची जंगी मिरवणूक: पुण्यात ढोलताशांच्या गजरात दीड किलो चांदीची गदा भेट देऊन सत्कार


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

हिंदकेसरी हा बहुमान पटकावणाऱ्या अभिजीत कटके याचा रविवारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत कटके यांना दीड किलो चांदीची गदा भेट देण्यात आली.

Advertisement

अभिजीत कटके याने हिंदकेसरी किताब मिळवून त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्याने यापूर्वी महाराष्ट्र केसरीचा किताब देखील पटकावला आहे. अभिजीत यांच्या क्रीडा क्षेत्रातील या यशाला आणि परिश्रमांना तसेच त्यांनी दाखविलेल्या जिद्दीला मानवंदना म्हणून त्यांच्या सत्काराचा तसेच मिरवणुकीचा उपक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला.

भारतीय शैली कुस्ती महासंघाने हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या मानाच्या स्पर्धेत अभिजीत कटके याने हिंदकेसरी चा किताब पटकवला. अंतिम सामन्यात पुण्याच्या जिगरबाज कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाच्या सोमवीर वर विजय मिळवला.

Advertisement

आज पुणे शहरातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात हिंदकेसरी अभिजीत कटके याचा संजय काकडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत कटकेची ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठी गर्दीही दिसून आली.

या प्रसंगी माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी नगरसेवक शंकर पवार, राहुल भंडारे, धीरज घाटे, हेमंत रासने, योगेश समेळ, तुषार पाटील, दिलीप काळोखे, ओंकार कदम, मनीष साळुंखे, समीर शेंडकर, केदार मानकर, महेश सकट, वसंत चौगुले, गणेश यादव, प्रशांत मते आणि मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement