हिंगोलीत सकल मराठा समाज आक्रमक: घोळवापाटी, चोंढीफाटा येथे रास्तारोको, येहळेगावमधून ढोल बजावो पदयात्रा

हिंगोलीत सकल मराठा समाज आक्रमक: घोळवापाटी, चोंढीफाटा येथे रास्तारोको, येहळेगावमधून ढोल बजावो पदयात्रा


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Hingoli, The Entire Maratha Community Is Aggressive, Stop The Road At Gholwapati, Chondhipata, And Play Drums From Yehlegaon; Tractor March Of Villagers Of Navkha, Tuppa, Futana

हिंगोली26 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जालना लाठीचार्जची चौकशी करावी या मागण्यांसह आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी हिंगोली जिल्हयात बुधवारी ता. 13 ठिकठिकाणी आंदोलन झाले. येहळेगाव सोळंके येथून औंढा नागनाथ तहसील कार्यालयापर्यंत ढोल बजावो पदयात्रा काढण्यात आली. यावेळी शेकडो गावकरी उपस्थित होते.

Advertisement

कळमनुरी तालुक्यातील घोळवा पाटी येथे हजारो नागरीकांनी रास्तारोको केला. यामुळे हिंगोली ते नांदेड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. त्यानंतर औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर चोंढीफाटा येथे रस्ता रोकोमुळे नांदेड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे दोन तासानंतर वाहतुक सुरळीत झाली. तसेच कळमनुरी तालुक्यातील फुटाणा, नवखा, तुप्पा येथील सकल मराठा समाजातील नागरीकांनी तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोेर्चा काढला. त्यानंतर प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. तर कामठा फाटा येथे साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.

येहळेगाव सोळंके ते औंढा नागनाथ या सुमारे 10 किलो मिटर अंतराचा ढोल बजाओ पदयात्रा काढण्यात आला. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पदयात्रा तहसील कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात आजपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे. तसेच कळमनुरी, वसमत येथे उपोषण सुरु आहे. तर कुरुंदा येथे उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. अकोली येथील शाळेत सलग दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी आले नाही.

Advertisement



Source link

Advertisement