हिंगोलीत धाब्यावर दारुविक्री: सेनगावच्या सातबारा ढाबा चालकाला एक लाखाचा दंड; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश

हिंगोलीत धाब्यावर दारुविक्री: सेनगावच्या सातबारा ढाबा चालकाला एक लाखाचा दंड; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश


हिंगोलीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सेनगाव येथील सातबारा नावाच्या ढाब्यावर दारू विक्री करत असताना दुसऱ्यांदा पकडल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी ढाबा चालकाला एक लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. सदर रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात आली आहे.

Advertisement

सेनगाव येथील सातबारा नावाच्या धाब्यावर अवैधरित्या मद्यविक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यावरून उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आदित्य पवार यांच्या पथकाने धाब्यावर छापा टाकून अवैधरित्या दारू विक्री होत असताना पकडले होते. या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे बंधपत्र बाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावरून उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी ढाबा चालक अमोल मोहोळे याच्याकडून चांगल्या वर्तणूकीचे एक लाख रुपयांचे बंधपत्र घेतले होते.

त्यानंतरही सदरील ढाब्यावर दारू विक्री सुरू होती. त्यानंतर पुन्हा उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणात बंधपत्राचे उल्लंघन केल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरून उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी ढाबाचालक अमोल मोहोळे याला एक लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. सदरील दंडाची रक्कम न भरल्यास स्थानबद्ध करण्याचे आदेशही पारधी यांनी काढले. त्यानुसार अमोल मोहळे याने नुकतीच एक लाख रुपयांची दंडाची रक्कम शासन खाती जमा केली आहे. कारवाईमुळे जिल्ह्यातील ढाबा चालकांमधून खळबळ उडाली आहे.

Advertisement

ढाबा चालकांनी दारू विक्री करू नये

राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक्षक ​​​​​​​आदित्य पवार म्हणाले की, जिल्ह्यातील ढाबा चालकांनी अवैधरित्या दारू विक्री करू नये. तसेच दारू पिण्यासाठी व्यवस्था ही करू नये. अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत अठरा प्रकरणात 6.90 लाख रुपये किमतीचे बंधपत्र घेण्यात आले आहे.

AdvertisementSource link

Advertisement