मुंबई9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार संविधानातील इंडिया शब्द वगळण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. विरोधकांनी हे सर्व काही आपल्या ‘इंडिया’ आघाडीमुळे केले जात असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हवे तर आम्ही भारत नाव घेतो, पण जनतेच्या डोक्यावर सुमारे 14 हजार कोटींचा बोजा टाकू नका, अशी उपरोधिक विनंती त्यांनी केंद्राला केली आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा नारायण दादा काळदाते स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी सुळे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून राज्य सरकार, तर भारत व इंडियाच्या मुद्यावरून केंद्रावर हल्ला चढवला.
मोदी सरकार विरोधकांना घाबरले
विरोधकांनी आपल्या आघाडीला इंडिया नाव दिले. त्यामुळे आता सरकारने जनतेच्या डोक्यावर 14 हजार कोटींचा बोजा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही इंडिया नाव दिले. कारण, ते एक चांगले नाव आहे. पण सरकार एवढे घाबरले की, ते आता देशाचे नाव इंडिया ऐवजी भारत करणार आहेत. माझी भाजपला हात जोडून विनंती आहे. हवे तर आम्ही आमच्या आघाडीचे नाव भारत करतो. पण तुम्ही इंडिया नाव बदलून जनतेच्या डोक्यावर 14 हजार कोटींचा बोजा टाकू नका, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
14 हजार कोटी मायबाप जनतेचे
सरकार खर्च करणारे 14 हजार कोटी आमच्या गरीब मायबाप जनतेचे आहेत. हे पैसे केवळ नाव बदलण्यासाठी खर्च कर नका. या पैशांच्या मदतीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या. या पैशांतून देशभरात रुग्णालये व शाळा बांधता येतील. त्यामुळे सरकारने जनतेच्या घामाचे पैसे नाव बदलण्यासाठी खर्च करू नये, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
वाचा खालील बातमी…
फू बाई फू.. फुगडी फू..!:BJP नेते किरीट सोमय्या यांची दहीहंडीत भन्नाट फुगडी, भरपावसात खांद्यावर चढून केला डान्स; पाहा VIDEO
मुंबईसह राज्यभरात गुरुवारी दहीहंडीचा सोहळा थाटामाटात पार पडला. त्यात सत्ताधारी व विरोधकांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. विशेषतः मुंबई व ठाण्यात मोठमोठ्या बक्षिसांच्या मानाच्या हंड्या आयोजित करण्यात आल्या होत्या. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राम कदम यांच्या घाटकोपरमधील दहीहंडी सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी महिलांसोबत फुगडी खेळून व तरुणांसोबत भर पावसात डान्स करून एकच धमाल उडवून दिली.
किरीट सोमय्या यांनी राम कदम यांच्या दहीहंडीला भेट देऊन अभिनेता गोविंदासोबत मनसोक्त डान्स केला. तसेच भरपावसात गोविंदांच्या खांद्यावर बसून नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला. एवढेच नाही तर त्यांनी गोविंदांच्या थरांवरही चढले. याशिवाय पारंपरिक मराठी वेशभूषेत आलेल्या काही महिलांसोबत त्यांनी फुगड्याही घातल्या. वाचा संपूर्ण बातमी…