हवामान: राजस्थानतील कमी हवेचा दाब महाराष्ट्रातील पाऊस तिकडे घेऊन जाणार; धास्तावलेल्या शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा


छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पश्चिम विक्षोपामुळे शहरासह राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. मात्र, राजस्थानमध्ये 1006 हेक्टापास्कल कमी हवेचा दाब निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावरील पावसाचे सावट तिकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पाऊस पुढे सरकेल व उडीप मिळणार आहे. उन्हाळा ऋतुला सुरुवात होईल. याचा धास्तावलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

Advertisement

पश्चिमी विक्षोपामुळे उत्तर, हिमालच मध्ये बर्फवष्टी, पाऊस पडत आहे. तिकडील अतिशीत, बाष्प आणि आर्द्रतायुक्त वारे गुजरात, मध्य प्रदेशकडून आपल्याकडे येत आहेत. त्यामुळे गत चार दिवसांपासून ढगांची गर्दी, जेथे पोषक वातावरण तिथेच मेघ गर्जनेसह काही वेळेत धो धो पाऊस पडतोय. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. यात जीवित हाणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

हातातोंडाशी आलेले गहू, शाळू ज्वारी, मका, हरभरा, सोयाबीन, आंबा, आदी फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पांढरे शुभ्र ज्वारीचे कणीस पावसाच्या माऱ्याने काळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असून पावसाचे वातावरण केव्हा निवळते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. ईश्वराला साकडे घातले जात आहे. याबाबत हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांना विचारले असता, ते म्हणाले की, महाराष्ट्रावर 1008 हेक्टापास्कल कमी हवेचा दाब आहे. तर राजस्थानकडे 1006 हेक्टपास्कल दाब असून तो आपल्याकडील पाऊस तिकडे खेचून घेऊन जाईल. त्यामुळे दोन दिवसांत पावसाची संपूर्ण स्थिती निवळेल. उन्हाळा ऋतूस सुरुवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये. असे आवाहन त्यांनी केले. पाऊस शुक्रवारी मध्यरात्री ६ मिमी पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेध शाळेने घेतली आहे.

Advertisement

तापमान

कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 6 अंश सेल्सियसने कमी म्हणजे 30.6 अंश नोंदवले गेले. तर पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उत्तरेतील अतिशीत वारे वाहून येत आहेत. त्यामुळे किमान तापमानही सहा अंशांनी निचांकी 13.3 अंशांवर असल्याची नोंद चिकलठाणा वेध शाळेने घेतली आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement