नाशिक5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
“शिवीगाळ का करतोस,” असे विचारल्याचा राग आल्याने एका युवकाने तरुणावर धारदार हत्याराने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत रिहान ऊर्फ राहिल लियाकत सय्यद (वय ३१, रा. डेव्हलपमेंट एरिया देवळाली कॅम्प) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी पक्या ऊर्फ प्रकाश उन्हवणे (रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प ) हा सोमवारी (दि. १५) सायंकाळच्या सुमारास गौरव वडापाव सेंटरच्या पाठीमागे आरडाओरडा करून शिवीगाळ करीत होता. त्यावेळी फिर्यादी विहान सय्यद याने शिवीगाळ का करतोस, असे उन्हवणे याला विचारले. त्याचा राग आल्याने उन्हवणे याने हातातील धारदार हत्याराने सय्यद याच्या मागून येऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याला दुखापत केली.
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रकाश उन्हवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लियाकत पठाण करीत आहे.