मुंबई14 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
दिल्लीत आप सरकारविरोधात भाजपने दोन, तीन वेळेस ऑपरेशन लोटस राबवले. मात्र, आमचा एकही आमदार फुटला नाही. त्यामुळे आता अध्यादेश काढून सरकारला शक्तिहीन करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.
अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला.
दिल्लीचा 8 वर्षांचा संघर्ष
अरविंद केजरीवाल म्हणाले, 2015ला दिल्लीत आपचे सरकार बनताच मोदी सरकारने एक नोटीफिकेशन काढत आमच्याकडून सर्व शक्ती अक्षरश: हिसकावून घेतली. त्यानंतर आमच्या अधिकारांसाठी आम्ही 8 वर्षे सर्वोच्च न्यायालयात संघर्ष केला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. मात्र, पुन्हा अवघ्या 8 दिवसांतच केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून आमच्याकडून ती शक्ती पुन्हा काढून घेतली.
भाजप सुप्रीम कोर्टालाही मानत नाही
अरविंद केजरीवाल म्हणाले, या एका अध्यादेशाने केंद्र सरकारने जाहीर केले आहे की, ते सर्वोच्च न्यायालयालाही आता मानत नाहीत. आपल्याविरोधात निर्णय गेल्यास न्यायाधीशांना ट्रोल केले जाते. त्यांना शिव्या दिल्या जातात. सोशल मिडियावर त्यांच्याविरोधात मोहीम राबवली जाते. मात्र, आता तर केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे स्पष्ट संदेश दिला आहे की, सर्वोच्च न्यायालयाचेही ते आता ऐकणार नाही. ते आता लोकशाहीलाही मानत नाहीत.
31 राज्यपालांनीच देश चालवावा
अरविंद केजरीवाल म्हणाले, लोकांनी निवडलेल्या सरकारने राज्य चालवावे कि राज्यपालांनी असा प्रश्न आता पडला आहे. पंबाजमध्ये तर राज्यपालांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनही होऊ दिले नाही. या अधिवेशनाला राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. लोकशाहीत असे होऊ शकते का? केंद्र सरकारला लोकशाहीच मान्य नसेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या 31 राज्यपालांनीच आता देश चालवावा.
सरकार बनवण्यासाठी आमदारांची खरेदी
अरविंद केजरीवाल म्हणाले, जेथे भाजपचे सरकार बनले नाही तेथे ईडी, सीबीआयचा वापर करून आमदार फोडले गेले. भाजपने सरकार बनवण्यासाठी आमदारांची खरेदी केली. दिल्लीत भाजपला हेदेखील जमले नाही, त्यामुळे अध्यादेश काढून आमच्या सरकारची सर्व शक्ती काढून घेतली. एखादा व्यक्ती जेव्हा फार अहंकारी बनतो, तेव्हा तो स्वार्थी बनतो. असा व्यक्ती देश चालवू शकत नाही, असा टोला अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना लगावला.
संबंधित वृत्त
राजकारण:आगामी निवडणुकांत हरलो तर देशातून लोकशाही गायब होईल, उद्धव ठाकरेंचा घणाघात; केजरीवालांनी मातोश्रीवर घेतली भेट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत या सर्व नेत्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. येणारा काळ हा निवडणुकांचा आहे. त्यामध्ये आपली ट्रेन सुटली तर देशातून लोकशाही गायब होईल. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एक आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. वाचा सविस्तर