अमरावती4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
परतवाडा-अंजनगाव मार्गावरून हनवतखेडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत चिरडले जावून युवतीचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. 16) घडली. हनवतखेडा येथील निवासी प्रतीक्षा राजेंद्र गावंडे (22) असे अपघातातील मृतक युवतीचे नाव आहे.
घटनेच्या वेळी मृतक प्रतिक्षा ही प्लेझर या मोपेडने (एमएच 27/ एटी 0595) परतवाडा येथील रुग्णालयात जात होती. दरम्यान भरधाव वेगाने गिट्टीने भरलेल्या टिप्परची (एमएच 27/ एक्स 6856) तिला धडक बसली. त्यात ती टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने चिरडल्या गेेली. त्यात प्रतीक्षेचा जागीच मृत्यू झाला.
दुर्लक्ष होत असल्याची ओरड
मृत प्रतीक्षा ही भ. शि. पाटील महाविद्यालयाची बी. कॉम.ची विद्यार्थीनी आहे. राजेंद्र गावंडे यांच्या कुटुंबात सर्वात लहान असून तिला तीन बहिणी व एक भाऊ आहे. परतवाडा ते हनवतखेडा हा रस्ता एकेरी असून जवळच्या शेतकऱ्यांनी शेताच्या हद्दीत अधिक झुडपे लावल्याने रस्ता आणखीच लहान झाला आहे. त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाही. त्यामुळे साहजिकच अपघाताची सतत भीती असते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड घटनेच्या अनुषंगाने नागरिकांकडून होत आहे.
दररोज अपघात होत असताना आजतागायत ही झुडपे तोडण्याचे व हटवण्याचे काम करण्यात आलेले नाही. अपघाताची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत प्रतिक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पुढील तपास परतवाडा पोलिस करीत आहेत.
नागरिकांची ओरड
परतवाडा ते हनवतखेडा हा रस्ता एकेरी असून जवळच्या शेतकऱ्यांनी शेताच्या हद्दीत अधिक झुडपे लावल्याने रस्ता आणखीच लहान झाला आहे. त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाही. त्यामुळे साहजीकच अपघाताची सतत भीती असते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड घटनेच्या अनुषंगाने नागरिकांकडून होत आहे.