पुणेएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
लोकशाही मुल्यांचे खच्चीकरण, स्वायत्त संस्थांचे एकवटीकरण व देशाची साधन-संपत्ती मुठभरांच्या हातात, म्हणजे ‘नवा भारत’ नव्हे तर नव्या स्वतंत्र भारताची सुरवात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी केली होती असे मत माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त ‘राजीव गांधी स्मारक समिती’ तर्फे आयोजित अभिवादन पर कार्यक्रमात आदरांजली वाहताना ते बोलत होते.
दलवाई म्हणाले, आधुनिक जगाशी संपूर्ण देश जोडण्याचे काम राजीव यांनी केले. गरीब व्यातीच्या हातात आलेला फोन हा त्यांनी आणला आहे, ही लक्षात घेण्याची गरज आहे. त्यावेळी स्व राजीव गांधी यांनी आणलेल्या संगणक क्रांतीवर सध्याचे सत्ताधारी व तेंव्हाचे विरोधक आदींनी मोठी टीका केली होती. परंतु आता संगणकाशिवाय पर्याय नाही. आज राजकारणात महिला पुढे आहेत, त्याचे श्रेय राजीव गांधी यांनी पहिल्यांदा महिलांना ३३% टक्के आरक्षण दिले याचे आहे.
आमदार संजय जगताप म्हणाले, राजीव गांधींनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचे हे ३२ वे वर्ष असून २१ व्या शतकातील नवी दिशा आणि प्रगतिशील भारताची पायाभरणी त्यांनी केली. त्यांच्या बलिदानामुळेच देशाला दिशा मिळाली आहे.
स्मारक समिती अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी प्रास्ताविकात स्वातंत्र्योत्तर भारताची एकता, अखंडता व एकात्मते’साठी दिवंगत पंतप्रधानानांनी शहीदत्व स्वीकारले. त्यांची हत्त्या हा इतिहासातील काळा दिवस असून भाजप पाठिंब्यावरील व्हीपी सिंग सरकार विरोधात काश्मीरी पंडीतां वरील हल्ले व त्यांचे सुरक्षे करीता, त्यांनी संसदेस घेराव देखील घातला होता.याचे स्मरण सत्ताधिशांनी ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. संगणकक्रांतीचे जनक व देशास २१ व्या शतकाची दिशा देणाऱ्या नेतृत्वाची २१ मे १९९१ साली हत्या झाली. त्यांच्या सात वर्षाच्या काळात देशाचा विकासाचा आलेख सर्वाधिक होता, असे ही प्रतिपादन तिवारी यांनी केले.
यावेळी राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, आमदार संजय दादा जगताप, कमलताई व्यवहारे, श्रीरंग चव्हाण, सुर्यकांत मारणे, राधीका मखामले, सुनील पंडीत, राजेंद्र खराडे, द स पोळेकर, भूषण रानभरे, सुभाष थोरवे, संजय अभंग, हरिदास अडसुळ, रमेश सोनकांबळे, रवि ननावरे, भरत सुराणा, प्रकाश आरणे, आण्णा गोसावी, ॲड संदीप ताम्हणकर उपस्थित होते.