स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य आक्रमक!: विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्तालय समोर आंदोलन; पाल्यांना नोकरीत घेण्याकडे दुर्लक्ष

स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य आक्रमक!: विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्तालय समोर आंदोलन; पाल्यांना नोकरीत घेण्याकडे दुर्लक्ष


औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक, त्यांची पत्नी व परिवाराने 12 ते 14 सप्टेंबर 2022 रोजी 3 दिवस उपोषण आंदोलन केले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन दिलेले आश्वासनानंतर एक वर्ष उलटले तरी अजून आश्वासनाची पूर्ती झाली नाही त्यामुळे स्वातंत्र सैनिकांच्या पाल्याच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Advertisement

एकनाथ शिंदे यांनी 29 सप्टेंबर 2022 रोजी स्वतःच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीमध्ये प्रलंबीत मागण्यांबाबत कालावधीमध्ये सदरील मागण्या पूर्ण करण्यात निर्देश देण्यात आलेले होते. सदरील संबंधित प्रशासकीय विभागांना निश्चित बैठक होऊन तब्बल 1 वर्षाचा कालावधी होत आला तरी प्रशासनाने अंदोलनातील मुख्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.ही बाब अमृत महोत्सवी वर्षामध्ये पुरोगामी संपन्न महाराष्ट्राला भूषावह निश्चितच नाही.त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत असल्याचे आंदोलन कर्त्यानी सागितले.

स्वातंत्र्य सैनिक कक्षात प्रश्न सुटत नाहीत

Advertisement

स्वातंत्र्य सैनिकांसंबंधी निर्माण होणाऱ्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईत स्वतंत्र अशा ‘स्वातंत्र्य सैनिक कक्षाची स्थापना’ करण्यात आली. मात्र मागील अनेक वर्षापासून स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या परिवाराच्या विविध योजना, सुविधा, असणाऱ्या सुविधांमध्ये काळानुरुप बदल करुन प्रस्ताव शासनाकडे पाठविणे या बाबत दुर्दैवाने कोणतेही काम झाले नाही. उलट स्वातंत्र्य सैनिक कक्षाने सुविधा, सवलती समाप्तीचे चुकीचे तसेच दिशाभूल करणारे निर्णय घेऊन स्वातंत्र्य सैनिक परिवारावर अन्याय केलेला दिसून येतो. त्यामुळे यास ‘स्वातंत्र्य सैनिक विरोधी कक्ष’ असेच म्हणण्याची उद्विग्न भावना तमाम स्वातंत्र्य सैनिक तथा त्यांच्या परिवारामध्ये निर्माण झालेली आहे.

पाल्यांना नोकरीत घेण्याकडे ही दुर्लक्ष

Advertisement

12 ऑक्टोबर 1965 पासून स्वातंत्र्य सैनिकांच्या एका नामनिर्देशित पाल्यास शासन सेवेत घेण्याबाबत धोरण होते. .04 मार्च 1991 चा सर्व समावेशक मार्गदर्शक असा शासन निर्णय होऊन जवळपास 80% च्या वर स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य शासन सेवेत आहेत. मात्र राज्यात दोन ते अडीच हजार पाल्य नौकरीच्या लाभापासून वंचित आहेत. शासन धोरण-निर्णय असतांना देखील त्यांच्यावर 20-22 वर्षांपासून अन्याय होत आहे.

12 सप्टेंबर 2023 पासून छत्रपती संभाजीनगर येथे संपूर्ण महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक, त्यांची पत्नी व परिवार यांनी बेमुदत धरणे आंदोलन-साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने पाल्य सहभागी झाले आहेत.

AdvertisementSource link

Advertisement