स्वस्तात आयफोन मिळवून देण्याच्या आमिष: पोलीस हवालदाराचीच दीड लाखाने केली एकाने फसवणूक; पर्वती ठाण्यात गुन्हा दाखल

स्वस्तात आयफोन मिळवून देण्याच्या आमिष: पोलीस हवालदाराचीच दीड लाखाने केली एकाने फसवणूक; पर्वती ठाण्यात गुन्हा दाखल


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • A Police Constable Was Cheated On The Pretext Of Getting A Cheap IPhone | Police Constable Was Cheated On The Pretext Of Getting A Cheap IPhone

पुणे10 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

दीड लाखाचा आयफोन एक लाखात मिळवून देण्याच्या आमिषाने एका भामट्याने पुणे शहर पोलिस दलातील हवालदाराची 1 लाख 15 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुरज सुभाष शेडगे (वय-40, रा. स्वारगेट पोलीस लाईन) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश तुकाराम सुतार (रा. जनता वसाहत, पर्वती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना एप्रिल 2023 पासून आत्तापर्यंत घडली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी सुरज शेडगे हे पोलीस हवालदाराची आहेत. आरोपी गणेश सुतार याने दीड लाखाचा आयफोन एक लाखात मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेडगे यांच्याकडून १ लाख १५ हजार रुपये घेतले. मात्र आयफोन न देता फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरवदे करत आहेत.

कपड्याऐवजी चिंध्या पाठवल्या, 3 लाखांची फसवणूक

Advertisement

इतर एजंट पेक्षा कमी किंमतीत कपडे मिळवून देत असल्याचे सांगून चिंध्या पाठवत वडगाव शेरी येथील एका व्यावसायिकाची 2 लाख 27 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जस्मिन अतुल पुरी (वय-35, रा. वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल धारक, बँक खातेधारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी जस्मिन पुरी यांना मोबाईल धारकाने फोन करून तो कापड डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत असल्याचे सांगितले. तसेच त्याचे मोठं मोठ्या कपड्याच्या फॅक्टरीशी चांगले संबंध आहेत व इतर कपड्याच्या एजंट पेक्षा कमी किंमतीत इतर कपड्याच्या एजंटपेक्षा कमी किंमतीत कपड्याची डिलेव्हरी देतो असे सांगून प्रलोभन दाखवले. त्यानंतर फिर्यादींकडून २ लाख ९७ हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात कपडे पाठविण्याच्या ऐवजी त्यांना कपड्याच्या चिंध्या पाठवल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी चंदनगर पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

Advertisement



Source link

Advertisement