स्वराज ट्रॅक्टर: कोळपेवाडी येथून चोरीला गेलेल्या‎ स्वराज ट्रॅक्टरसह आरोपीला अटक‎


कोपरगाव2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोळपेवाडी येथून २‎ लाख रुपये किमतीचा चोरी गेलेला ‎ ‎ स्वराज ट्रॅक्टर व चोरणाऱ्या‎ आरोपीस कोपरगाव तालुका ग्रामीण ‎ ‎ पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद ‎ ‎ केले असल्याची माहिती कोपरगाव ‎ ‎ तालुका ग्रामीण पोलिस निरीक्षक ‎ ‎ दौलतराव जाधव यांनी दिली.‎ ७ जून २०२२ रोजी रात्री ११ वाजे‎ ते ८ जून २०२२ रोजीचे ४ वाजेच्या‎ दरम्यान कोपरगाव तालुक्यातील‎ कोळपेवाडी येथून स्वराज कंपनीचा‎ ट्रॅक्टर क्रमांक एमएच १७ एव्ही‎ ४२१६ हा चोरट्याने चोरुन नेला‎ असल्याबाबत कोळपेवाडी येथील‎ शेतकरी शाकीर हमीद सय्यद यांनी‎ दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका‎ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात‎ आला होता.‎ कोपरगाव तालुका पोलिस‎ ठाण्याचे अधिकारी व पोलिस‎ अंमलदार यांनी गुन्ह्याच्या तपासाचे‎ ‎चक्रे फिरवून चोरीस गेलेल्या‎ मुद्देमालाचा व आरोपीचा गोपनीय‎ बातमीदारामार्फत माहिती घेऊन‎ तपास केला. स्वराज कंपनीचा‎ ट्रॅक्टर चोरून नेणारा आरोपी दीपक‎ चंद्रभान मोरे, वय ३२, रा. कोळगाव‎ थडी यास पोलिसांनी १७ जून रोजी‎ रात्री २ वाजेच्या सुमारास सापळा‎ रचून शिताफिने जेरबंद केले.‎ त्याच्याकडून चोरीस गेलेला दोन‎ लाख रुपये किंमतीचा स्वराज‎ कंपनीचा ट्रॅक्टर धारणगाव गावठाण‎ येथील पडीत जागेत काटवणात‎ लपवून ठेवलेला होता, तो हस्तगत‎ करण्यात आला.‎ ही कामगिरी पोलिस अधीक्षक‎ मनोज पाटील, अप्पर पोलिस‎ अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय‎ पोलिस अधिकारी संजय सातव‎ यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव‎ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस‎ निरीक्षक दौलत जाधव, पोलिस‎ नाईक विलास कोकाटे, पोलिस‎ कॉन्स्टेबल अविनाश तमनर,‎ नवनाथ गुंजाळ व किसन सानप‎ यांनी केली.‎

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement