स्मृती मंधानाचा संघ जिंकवूनही हारला, वेलोसिटी फायनलमध्ये काय आहे गणित…

स्मृती मंधानाचा संघ जिंकवूनही हारला, वेलोसिटी फायनलमध्ये काय आहे गणित...
स्मृती मंधानाचा संघ जिंकवूनही हारला, वेलोसिटी फायनलमध्ये काय आहे गणित...

गुरुवारी महिला टी२० चॅलेंज स्पर्धेतील तिसरा आणि महत्त्वाचा सामना वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्रेझर्स संघात पार पडला. हा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर खेळण्यात आला. हा सामना ट्रेलब्रेझर्स संघाने १६ धावांनी खिशात घातला. या विजयात सभीनेनी मेघना आणि किरण नवगिरे यांनी मोलाचे योगदान दिले. मात्र, पराभूत होऊनही वेलोसिटी संघाने अंतिम सामन्यात धडक मारली.

या सामन्यात वेलोसिटी (Velocity) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या ट्रेलब्रेझर्स (Trailbrazers) संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १९० धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेलोसिटी संघाला निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १७४ धावाच करता आल्या.

Advertisement

वेलोसिटी संघाकडून फलंदाजी करताना किरण नवगिरे हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने ३४ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. यामध्ये ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त शेफाली वर्मा हिने २९ धावांचे योगदान दिले. यानंतर फक्त यास्तिका भाटिया (१९ धावा), लॉरी वोल्वार्ड (१७ धावा), सिमरन बहादूर (१२ धावा) आणि स्नेह राणा (११ धावा) यांनाच १० धावांचा आकडा पार करता आला. यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. यावेळी ट्रेलब्रेझर्सकडून गोलंदाजी करताना राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त रेणुका सिंग, हॅले मॅथ्यूज, सलमा खातून आणि सोफिया डंकले यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Advertisement

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी ट्रेलब्रेझर्सकडून करताना सब्भीनेनी मेघना हिने सर्वाधिक धावा चोपल्या. तिने ४७ चेंडूत ७३ धावा केल्या. या धावा करताना तिने ४ षटकार आणि ७ चौकार मारले. तिच्याव्यतिरिक्त जेमिमाह रोड्रिगेज हिने ६६ धावांचे योगदान दिले. तसेच, हॅले मॅथ्यूज हिने २७ आणि सोफिया डंकले हिने १९ धावा चोपल्या. कर्णधार स्म्रीती मंधाना फक्त १ धाव करून बाद झाली. मात्र, तरीही तिच्या संघाने चांगली धावसंख्या उभारली.

यावेळी वेलोसिटीकडून गोलंदाजी करताना सिमरन बहादूर हिने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. यावेळी तिने ३ षटके गोलंदाजी करताना ३१ धावा देत या २ विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त केट क्रॉस, स्नेह राणा, आयाबोंगा खाका यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली. महिला टी२० चॅलेंज स्पर्धेतील अंतिम सामना शनिवारी (दि. २८ मे) सुपरनोव्हाज आणि वेलोसिटी संघात खेळला जाणार आहे. हा सामना देखील पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला जाईल.

Advertisement