स्टार्स स्पोर्ट्सच्या पॅनेल मधील भारतीय संघाचा मॅच विनर गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

स्टार्स स्पोर्ट्सच्या पॅनेल मधील भारतीय संघाचा मॅच विनर गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात
स्टार्स स्पोर्ट्सच्या पॅनेल मधील भारतीय संघाचा मॅच विनर गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण भारताच एक मॅचविनर गोलंदाज आता मुंबईच्या संघासाठी मैदानात उतरणार आहे. हा गोलंदाज बायो बबलमध्ये दाखल झाला असून तो मुंबईच्या संघासह सरावही करत आहे. त्यामुळे आता लगेच नवव्या सामन्यात त्याला मुंबईचा संघ संधी देणार असल्याचे दिसत आहे. हा खेळाडू नेमका आहे तरी कोण, पाहा… मुंबई इंडियन्ससाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. मुंबई आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना शनिवारी होणार आहे. या मुंबईच्या नवव्या सामन्यासाठी त्यांच्या संघातून एक भारताचा मॅचविनर खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे.

भारताचा हा मॅचविनर गोलंदाज आहे तरी कोण, पाहा…

Advertisement

आतापर्यंतच्या आठही सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाला पराभव पत्करावा लागला आहे. आतापर्यंतच्या आठही सामन्यांमध्ये मुंबईची गोलंदाजी हा कच्चा दुवा असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाला एका भारताच्या गोलंदाजाला आपल्या संघाकडून खेळण्याची विनंती केली होती. ही विनंती आता त्याने मान्य केली आहे. त्याचबरोबर हा मॅचविनर गोलंदाज आता नवव्या सामन्याच मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई इंडियन्सकडून यापूर्वी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी हा खेळत होता. पण या लिलावात त्याला मुंबईच्या संघाने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले नाही. त्यामुळे धवल हा यावेळी समालोचन करत असल्याचे समोर आले होते. पण त्यानंतर मुंबईच्या संघाने धवलला आपल्या संघाकडून खेळण्याची विनंती केली होती. धवलने समालोचन सोडून मुंबईच्या संघाकडून खेळण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता धवल हा बायो बबलमध्ये दाखल झाला असून त्याने सराव करायला सुरुवातही केला आहे. त्यामुळे आता मुंबईच्या नवव्या सामन्यासाठी धवल हा आपल्याला मैदानात खेळताना दिसू शकतो.

Advertisement

धवलने भारताकडून खेळतानाही चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर धवलला गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे धवलने जर आपल्या अनुभव पणाला लावला तर नक्कीच त्याचा फायदा मुंबईच्या संघाला होऊ शकतो. पण फक्त एकच गोष्ट त्याला न खेळण्याचे कारण ठरू शकते. ती गोष्ट म्हणजे, धवल आत्ताच मुंबईच्या संघात दाखल झाला आहे. त्यामुळे संघात दाखल झाल्यावर त्याला थेट संघात स्थान देणे उचित ठरणार नाही. कारण आतापर्यंत मुंबईचे बरेच गोलंदाज संघाबाहेर बसलेले आहेत. त्यामुळे आता संघात दाखल झालेल्या धवलला लगेच संधी द्यायची की बेंचवर बसलेल्या खेळाडूंना खेळवायचे, हा तिढा आता मुंबई इंडियन्सला सोडवावा लागणार आहे.

Advertisement