सोशल मीडियावर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत नसलेल्या बिहार  IPL संघांचा पकवला खयाली पुलाव

सोशल मीडियावर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत नसलेल्या बिहार IPL संघांचा पकवला खयाली पुलाव
सोशल मीडियावर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत नसलेल्या बिहार IPL संघांचा पकवला खयाली पुलाव

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध कोलकाता आज पहिला सामना होणार आहे. या सामन्याआधी सोशल मीडियावर एक भलतीच चर्चा रंगली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ अशा दोन संघाचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी दोन नवीन संघही आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. पहिला लखनौ सुपर जायंट्स आणि दुसरा गुजरात टायटन्स. यामध्ये लखनौचे कर्णधारपद केएल राहुलकडे आहे, तर हार्दिक पांड्या गुजरातचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक ट्विट खूप व्हायरल होत आहे, ‘जर बिहारची आयपीएल संघ असता तर त्याचे नाव काय असते?’ यावरुन नुसती धमाल सुरू आहे.

Advertisement

सोशल मीडियावर आता बिहारचा संघ आयपीएलमध्ये उतरली तर त्याचं नाव काय असेल यावर चर्चा रंगली आहे. युजर्सनी खूपच भन्नाट नावं सुचवली आहेत. @Nirdayiii नावाच्या युजरने मजेशीर ट्वीट करत प्रश्न विचारला की जर आयपीएलमध्ये बिहारचा संघ असता तर त्या संघाचं नाव काय असतं?

या युजरने जिया हो बिहार के लाला’ हे नाव तर असू शकत नाही असं म्हटलं त्यावर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या तर काही मीम्सही व्हायरल करण्यात आले. कोणी पटना पँथर्स, दरभंगा डॅगर्स अशी नाव सुचवली तर कोणी सत्तू सुपरचार्जर्स सारखे अजून मजेशीर नाव सुचवली आहे. त्याचप्रमाणे बिहारच्या संघासाठी आणखी एका युजरनं धमाल नाव सुचवलं आहे. लिट्टी-चोखा बिहारमध्ये खूप प्रसिद्ध असल्यानं, वापरकर्त्यानं संघाचं नाव ‘लिट्टी चोखा वॉरियर्स’ असं सुचवले आहे, तर एका युझरनं संघाचं नाव ‘ठेकुआ किंग्स’ असं ठेवलं आहे.

एक युजरने तर लिट्टी-चोखा असं नाव असेल असं मजेशीर ट्वीट देखील केलं आहे. लिट्टी चोखा वॉरियर्स, ठेकुआ किंग्स अशी अनेक नाव सुचवण्यात आली. आयपीएलमध्ये यंद गुजरात आणि लखनऊ संघ नवीन आले आहेत. १० संघांमध्ये ७० सामने खेळवण्यात येणार आहेत.

आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात आज संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. मात्र सोशल मीडियावर युजर्सनी बिहारच्या नावावरून तुफान चर्चा रंगवली आहे. सध्या याचीच खूप चर्चा सुरू आहे.

Advertisement