सोलापुरात हत्यासत्र थांबेना!: घरगूती वादातून तरुणाचा चोकूने भोसकून खून; तळेहिप्परगा परिसरातील घटना


सोलापूर10 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

तळेहिप्परगा परिसरातील शिकलगारवस्ती येथे राहणारे रवीसिंग सिसपालसिंग टाक ( वय 25) या विवाहित तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. शेजारील परिवारासोबत घरगुती भांडणातून हा प्रकार घडला आहे. सोमवारी (03 ऑक्टोबर) सकाळी 10.00 वाजता हा प्रकार उघडकीस आला.

Advertisement

काय आहे प्रकरण?

रवीसिंग हा लोखंडी साहित्य तयार करण्याचे काम करत होता. तसेच रानटी ( शुअर) पालन करून विक्री करत होता. त्याच्या शेजारी एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातील महिलांची भांडणे आईसोबत सुरू होती. भांडण सोडवण्याचा प्रयत्नात असलेल्या‌ रवीसिंग याला तुमच्यामुळे आमच्या दोन्ही सुना घर सोडून निघून गेल्या, असे म्हणत दोन ते तीनजणांनी चाकू हल्ला केला. छातीवर, पोटावर ठोसे मारल्यामुळे मुक्काम मार लागला. बेशुद्ध अवस्थेत उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच मरण पावल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

आरोपी फरार

रवीसिंग शेजारी एक कुटुंब राहायला आहे.‌ त्या कुटुंबातील दोन महिला पतीसोबत भांडण करून माहेरी गेले आहेत. या घटनेला रवीसिंगचा परिवार जबाबदार असल्याचे गैरसमज करून घेऊन याच्या आईसोबत भांडण करत होते.‌ ते भांडण सोडण्यासाठी गेल्यानंतर रवीसिंग याच्यावरच हल्ला झाला आहे. पत्नीही जखमी आहे. घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. याबाबत बोलताना जगबीरसिंग टाक म्हणाला, शेजारच्या लोकांनी भावावर हल्ला केला आहे. किरकोळ कारणावरून हा प्रकार घडला आहे. आमचा काही संबंध नसताना भांडण करून हल्ला केला असे सांगितले.

Advertisement

मारेकऱ्यांचा शोध सुरू

रवीसिंग याच्या पश्चात आई, चार भाऊ, पत्नी आणि आठ महिन्याचा एक मुलगा असा परिवार आहे. जोडभावीचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शासकीय रुग्णालयातही आले होते. नातेवाईक यांच्याकडे माहिती घेतली. फिर्याद घेण्याचे काम सुरू आहे. संशयित मारेकऱ्यांचाही शोध सुरू आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement