सोलापुरकरांनो सावधान: वाहतूक नियम मोडताय तर सावधान… होईल 500 ते 5 हजारांचा दंड


Advertisement

सोलापूर9 तासांपूर्वी

 • कॉपी लिंक
 • चार जानेवारीपासून वाढीव दंडानुसार कारवाई, सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे यांची माहिती

नियम मोडून वाहन चालवणाऱ्यांनी आता सावध होण्याची वेळ आली आहे. कारण वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर चार जानेवारीपासून वाढीव दंडानुसार कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे यांनी शनिवारी दिव्य मराठी कार्यालयात संवाद साधला. त्या वेळी ही माहिती दिली.

Advertisement

पोलिस आयुक्त हरीश बैजल, उपायुक्त दीपाली धाटे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत नो फाइन डे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नवीन नियमानुसार विविध कलमांखाली किमान ५०० ते ५००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याची‌ जनजागृती व्हावी, या उद्देशाने नो फाइन डे सप्ताह सुरू आहे. दररोज पाचशेहून अधिक जणांना मुख्यालयात नेऊन समुपदेशन करण्यात आले. ११ ठिकाणी नाकाबंदी होती. आरएसपी विद्यार्थ्यांची मदत मिळाली. चित्रगुप्त व यमदूतांच्या वेशभूषेत जनजागृती केली.

सहायक आयुक्त आर्वे म्हणाले, सोलापुरात वाहतूक नियम न पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चुकीच्या दिशेने ये-जा करणे. रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, कुठेही रिक्षा थांबवणे, बॅच बिल्ला ड्रेसकोड नियम न पाळणे सर्रास दिसून येते. सीट बेल्ट, हेल्मेट, चुकीच्या दिशेने जाणे, भरधाव वेगात वाहन चालवणे, वाहतूक अडथळा करून थांबणे, सिग्नल चौकात नियम न पाळणे असे प्रकार घडतात.

Advertisement

अनेकांना लेन कटिंगची माहितीच नाही. वाहन चालवताना मोबाइलवर बोलू नये, हा नियमही अनेकजण पाळत नाहीत, असे आमच्या लक्षात आले आहे. नवीन दंड परवडणारा नाही. वाहतूक नियम पाळण्याची सवय व्हावी. जनजागृती व्हावी, हा उद्देश आहे. चार जानेवारीपासून मात्र नवीन वाढीव दंडानुसार कारवाई होईल.

आयुक्तांसोबत उद्या बैठक
सोमवारी पोलिस आयुक्त यांच्या दालनात वाहतूक शाखा, महापालिका विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची संयुक्त बैठक आहे. प्रत्येक विभागाची जबाबदारी, वाहतूक नियम व नवीन दंडाबाबत नियोजन करण्यात येणार आहे.

Advertisement

नागरिकांनी नियम पाळावेत, दंडाची रक्कम मोठी.

 • ई-चालान (ऑनलाइन) दंड आहे.
 • पोलिस आयुक्त यांनी वाहतूक नियोजन गांभीर्याने घेतले आहे.
 • स्क्रॅप रिक्षा, विना परमिट रिक्षा यांच्यावर लक्ष राहील.
 • रिक्षांना ठरावीक थांबा नेमून दिले जाईल.
 • सर्व सिग्नल चालू करण्यात येतील.
 • वेगमर्यादा २/३/४ चाकी व अन्य वाहनांसाठी अनुक्रमे १, २, ४ हजार रुपये
 • वाहतूक अडथळा करून थांबणे । ५०० ते १५००
 • नो एंट्रीमध्ये वाहन चालवणे- ५०० ते १५००
 • मोबाइलवर बोलणे-५०० ते १५००
 • ट्रिपल सीट-१ हजार दंड आणि ३ महिने परवाना रद्द
 • हॉर्न वाजवणे-१००० ते २०००
 • फॅन्सी नंबर प्लेट-१०००
 • खासगी वाहने तीन, चार चाकीकडून प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी ओरडणे ५००

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement