सेपक टकारा विभागीय स्पर्धा: बीवायके महाविद्यालयाच्या मुलींचा संघ विजयी; जळगाव संघाचा पराभव


नाशिक22 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्यामार्फत झालेल्या 19 वर्षा आतील विभागीय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेत बी वाय के कॉलेज संघाने अप्रतिम खेळी करत अंतिम सामन्यात विजय मिळवला. या स्पर्धेमध्ये प्रतीक्षा महाले हिने जळगाव संघाविरुद्ध उत्कृष्ट खेळ करत नाशिक संघास एकतर्फी विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला.

Advertisement

या स्पर्धेमध्ये विभागातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता. या खेळात बीवायके संघाकडून प्रतीक्षा महाले ,अमृता बोरस्ते ,सिया जैन, लावण्य मंडलिक, रोहिणी कणसे, यांनी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. जळगाव संघासमोर खेळी करताना 15-01 व 15-02 एकतर्फी विजय अंतिम सामन्यात मिळवला.

सेपक टकरा स्पर्धेत बीवायके महाविद्यालयाच्या खेळांडूनी केलेल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे स्पर्धेत महाविद्यालयासह नाशिकचे नाव उंचावले गेले आहे. आगामी स्पर्धेत आपल्या लाैलिका प्रमाणेच हा संघ कामगिरी करले अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने खेळांडूनी आपला सराव देखील सुरु केला आहे.

Advertisement

या यशस्वी खेळाडूंचे गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ.मो.स.गोसावी सर , संचालक एच .आर एम .डॉ.दीप्ती देशपांडे, संस्थेच्या व्यवस्थापन विभागाचे शैलेश गोसावी, विभागीय सचिव .डॉ. राम कुलकर्णी,. प्राचार्य डॉ. व्ही एन. सूर्यवंशी , रजिस्ट्रार गिरीष नातू, उपप्राचार्य. प्रवीण मुळे, क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. सुनील मोरे, प्राध्यापक .कुणाल महाजन जिमखाना विभागाचे अरुण पाकले यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement