सेक्स रॅकेटचा फांडाफोड: कोरेगाव पार्कमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय! 5 तरुणींची सुटका


पुणे9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात मसाजच्या नावाखाली तरुणीकडून वेश्याव्यवसाय करुन घेणार्‍यांचा भांडाफोड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे. कोरेगाव पार्कमधील हेल्थ लॅड क्लिनीक, थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनीक, थाई स्पामध्ये पोलीसांनी छापे टाकून पाच तरुणीची सुटका केली आहे. त्यामध्ये तीन परदेशी तरुणीचा समावेश आहे.

Advertisement

पीडित तरुणींना संरक्षणकामी रेस्क्यु फाउंडेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे शहरात कोरेगाव पार्कमध्ये मसाजच्या नावाखाली तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन खात्री केली असता, वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार पथकाने छापा टाकून तीन परदेशी मुलीसह पाच पिडीत तरुणीची सुटका केली आहे.

Advertisement

याप्रकरणी दोघांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव एपीआय अश्विनी पाटील, एपीआय अनिकेत पोटे, मनिषा पुकाळे, रेश्मा कंक, अजय राणे, सागर केकाण, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार यांनी केली आहे.



Source link

Advertisement