“सुशील कुमारला खूप राग आला आणि त्याने कुत्र्यांवर..”; कुस्तीपटूच्या हत्येपूर्वीची धक्कादायक माहिती आली समोरकुस्तीपटू सागर धनकरची हत्या करण्यापूर्वी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू सुशीलने कुत्र्यांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये सुशीलने तेथे उपस्थित काही कुस्तीपटूंवरही पिस्तुलाने हल्ला केला होता. दिल्ली पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रात सुशील कुमार यांच्यावर हा आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ मे २०२१ रोजी घडली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुशीलविरुद्ध दाखल केलेले पुरवणी आरोपपत्र सुशीलचा गार्ड अनिल धीमान आणि इतर आरोपींच्या जबाबावर आधारित आहे.

Advertisement

धीमानने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, तो २०१९ पासून सुशील कुमारसोबत काम करत होता. सुशीलची वैयक्तिक आणि अधिकृत अशी दोन्ही कामे तो पाहत असे. धीमानने सांगितले की ४ मेच्या मध्यरात्री तो सुशीलसोबत होता. त्या दिवशी सुशीलने ‘काही लोकांना धडा शिकवायचा आहे’ असे सांगून अनेकांना बास्केटबॉल मैदानावर बोलावले होते.

दिल्ली पोलिसांच्या आरोप पत्रामध्ये कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येप्रकरणी सुशीलसोबत राहुलवरही आरोप ठेवण्यात आले आहेत. राहुलने निवेदनात म्हटले आहे की, “सुशील आणि माझ्यासोबत आणखी एक साथीदार होता. आम्ही स्टेडियमवर पोहोचलो तेव्हा तिथे काही प्रशिक्षक आणि कुस्तीपटू उपस्थित असल्याचे दिसले. आम्ही येताच काही कुत्रे सुशीलच्या दिशेने भुंकायला लागले. त्यावेळी सुशीलला खूप राग आला, त्याने कुत्र्यांवर गोळीबार केला. यानंतर सुशीलने कुस्तीपटूंना जाण्यास सांगितले, त्यानंतर विकास नावाच्या कुस्तीपटूने सुशीलला विचारले- ‘काय झाले पैलवान जी?’ यानंतर सुशीलने विकासवर हल्ला केला आणि त्याचा फोन हिसकावला आणि त्याच्या मागे धावला.”

Advertisement

विकासला हाकलून दिल्यानंतर सुशील म्हणाला, ‘मी कुठे जातो, कोणाला भेटतो, काय खातो. हा सागर आणि सोनूने सर्वांना सांगत सुटतो. विकासशिवाय सुशीलने आणखी दोन पैलवानांना अशाच प्रकारे पळवून लावले होते. यानंतर सुशीलने तेथे उपस्थित असलेल्या चौथ्या पैलवानाला त्याचा फोन मागितला, त्याने फोन देण्यास नकार दिल्याने सुशीलने त्याच्या कपाळावर पिस्तुलाने मारले.

त्याच रात्री मी, सुशील आणि इतर साथीदार शालिमार बागेत गेलो आणि रात्री ११.३० च्या सुमारास अमित, रविंदर (त्यालाही सागरसह मारहाण करण्यात आली) यांना आम्ही उचलून छत्रसाल स्टेडियममध्ये आणले, असा दावा धीमानने केला. सुशीलच्या सांगण्यावरूनच दोघांना मारहाण केल्याचे धीमानने सांगितले. आम्ही त्याला स्टेडियममध्ये खूप मारहाण केली, त्यानंतर आम्ही मॉडेल टाऊनमधील फ्लॅटमध्ये गेलो आणि सागर आणि जय भगवानने सोनूला उचलून स्टेडियममध्ये आणले.

Advertisement

आरोपपत्रानुसार सुशीलने धीमानला सांगितले की, त्यांना जिवंत सोडू नका, सांगितले. या आरोपपत्रात प्रवीणवरही आरोप ठेवण्यात आले असून तो गुन्हेगार आहे. खुनासह इतर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या प्रवीणने सांगितले की, सुशील म्हणत होता की, मी या भागातील गुंड आहे, तू माझ्या फ्लॅटचा ताबा कसा घेणार? त्यांच्यावर लाठ्याकाठ्या मारत असताना सुशील हे सांगत होता.

धीमानने दावा केला, “आम्ही त्यांना लाठ्या, काठ्या, हॉकी स्टिक आणि बेसबॉल बॅटने मारहाण केली. आम्हाला सागर आणि जय भगवानला मारायचे होते कारण सुशीलने आम्हाला तेच करायला सांगितले होते. सुशीलला भीती होती की सागर आणि जय भगवान आपल्या विरोधात काम करत आहेत. ते सुशीलबद्दल माहिती गोळा करत होते, कारण त्याच्या जीवाला धोका होता, म्हणून त्यांना मारायचे होते.”

Advertisement

The post “सुशील कुमारला खूप राग आला आणि त्याने कुत्र्यांवर..”; कुस्तीपटूच्या हत्येपूर्वीची धक्कादायक माहिती आली समोर appeared first on Loksatta.Source link

Advertisement