पुणे37 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
भारत महत्वाचा सांस्कृतिक देश आहे पण काही जणांनी आपल्या इतिहासचे पान मिटवले. त्यामुळे आपल्याला देशाचा इतिहास मुघल इतिहास वाटतो आणि देशाचा सुवर्णकाळ आपण विसरलो. मेकॉले शिक्षण पद्धतीने आपला खरा विजयी इतिहास पासून दूर राखले गेले. जगातील सर्वात जुनी संस्कृती आपली आहे. शहर रचना, स्थापत्य शहर रचना दहा हजार वर्षापूर्वी आपल्याकडे होती आणि ती अनेक आक्रमणानंतर आपली सभ्यता टिकून राहिली. देश विश्वगुरुकडे वाटचाल करत आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित राष्ट्रीय कार्यकारी परिषद बैठकीच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे, जेष्ठ उद्योजक बाबा कल्याणी, अभविप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजशरण शाही,राष्ट्रीय मंत्री याज्ञवालक्या शुक्ला,सचिव बागेश्री मंठाळकर,प्रांत अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते,प्रदेश मंत्री ॲड अनिल ठोंबरे, अंकिता पवार उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, अभविप असे संघटन आहे की, जे विद्यार्थ्यांना नवीन दिशा देण्याचे काम करते. संघर्ष, आंदोलन ही मूल्ये मी संघटना मध्ये शिकलो. नेतृत्व गुण माझ्यातील विकास अभविप मधून झाला. संघटना कार्यपद्धती मधून नेतृत्व विकसित होते आणि संघटन क्षमता निर्माण होत असते.
नरवणे म्हणाले, देशातील अनेक भागातून विद्यार्थी आले हे अनेकता मध्ये एकतेचे प्रतीक आहे. विविध धर्म, जात, प्रदेश याचे संस्कृती स्वीकारून आपल्याला पुढे जावे लागणार आहे. अनेकताला शक्ती मानले तर, आपण आणखी विकसित होऊ. मातृभाषा, राष्ट्रभाषा, इंग्रजी यासोबत एक आणखी भाषा आपण शिकलो तर एकता वाढू शकेल. भारत असा देश आहे ज्याचे आर्थिक विकास वेगाने होत आहे.
अमेरिका, चीन नंतर जगात आपली सर्वात मोठी अर्थव्यवस्था लवकर होईल. आजच्या काळात युवक मध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण होणे महत्वाचे आहे.सैनिक शाळेत संख्या वाढवली जाते, मुलींना प्रवेश दिला जातो, एनसीसी विद्यार्थी संख्या दुप्पट करण्यात आली. अग्निपथ योजना द्वारे युवक शिस्त आणि कौशल्यपूर्ण होत आहे.
कल्याणी म्हणाले, देशाबाबत एकात्म भाव अभविप माध्यमातून युवक मध्ये निर्माण केले जात आहे. कोरोना काळात संकटाचा सामना करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे सामना करत होते. लसी साठी आपण अमेरिका आणि युरोप यांच्यावर अवलंबून न राहता आपण स्वतः लस निर्माण केली. चीन मध्ये नवीन कोरोना व्हेरीयांट विकसित झाला असून एक आठवड्यात त्याने ६० लाख जण बाधित होतात तो जून महिन्यात आपल्याकडे येणाचा धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण योग्य तो खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत आहे.
ऑस्ट्रेलिया मध्ये पंतप्रधान यांचे झालेले स्वागत पाहता जगात भारताचे स्थान अग्रेसर झाल्याचे दिसून येते. ३.२ ट्रिलियन देशाची अर्थव्यवस्था असून अमृत काल मध्ये सन २०४७ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन होऊ शकणार आहे. जगात इंटरनेट वापरात आपण अग्रेसर असून डाटा वापरात जगात पुढे आहे. देशात ९० हजार स्टार्टअप असून ते विविध क्षेत्रात आहे. सरासरी देशाचे वय २८ असून अर्थव्यवस्था तरुण आहे. त्यामुळे युवकांनी विकसित भारताचा दृष्टीने काम करावे. आज देश संरक्षण क्षेत्रात अग्रेसर होत असून उपकरणे अनेक देशांना निर्यात करत आहे.