सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय 2 महिन्यांत फिरवता: मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांचे कारण देता; जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका

सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय 2 महिन्यांत फिरवता: मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांचे कारण देता; जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका


जळगाव14 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने अवघ्या दोन महिन्यांतच सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय फिरविले. मराठा आरक्षणासाठी मात्र सारखे 50 टक्के अटीचे कारण देतात. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यातूनच आम्ही शरद पवारांना विनंती करतो की, शरद पवार तुम्ही 48 खासदारांचे नेतृत्व करा, पंतप्रधानांना सांगा की लोकसभेत कायदा आणा आणि मराठ्यांसाठी 16 टक्क्यांचे आरक्षण तुम्ही लोकसभेत आणा, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Advertisement

दरम्यान जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, भाजपवाले फक्त भांडण लावून देण्याचे काम करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली राज्य सरकारला अधिकाऱ्यांची नियुक्ती बदल्यांचे अधिकारी देण्याचा आदेश दिला हेाता. मात्र, केंद्र सरकारने संसदेत वटहुकूम काढत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अशा प्रकारे फिरवता येतो.

केंद्राने निर्णय बदलला

Advertisement

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी तीन सदस्यांची समिती असावी, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यात सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते असतील असे सांगितले. पण सत्ताधाऱ्यांना ते पटले नाही. यावरही वटहुकूम काढत सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल बदलला. सरन्यायाधीशांना त्या समितीतून बाहेर काढले आणि त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री आणला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले दोन निर्णय केंद्र सरकारने दोन महिन्यांत बदलले. त्याच प्रमाणे मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने वटहुकूम आणावा.

अध्यक्षीय निवडणूक प्रणालीचा प्रयत्न

Advertisement

जितेंद्र आव्हाड म्हणाले की,वन नेशन, वन इलेक्शनच्या माध्यमातून अध्यक्षीय निवडणूक प्रणाली आणण्याचा प्रयत्न आहे. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखून धरला पाहिजे. ऐन गणेशोत्सवात संसदेचे अधिवेशन बोलवता. हिंदुत्ववादी पक्ष म्हणता आणि हिंदूच्या सणांत संसदेत अधिवेशन बोलावता, हे हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षांना शोभत नाही.

गुलाबराव पाटील यांच्यावर टीका

Advertisement

जितेंद्र आव्हाड म्हणाले की,आपल्या पक्षातील काही लोक बाजूला गेले. पण सगळेच लाभार्थी आहेत. जळगाव जिल्ह्यात कोणी पन्नास खोके घेतले, तर आपला ‘गुलाब’ असा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी केला.



Source link

Advertisement