सुप्रीम कोर्टाची विचारणा: आत्महत्या करणाऱ्यांच्या मृत्यू प्रमाणपत्राचे काय? कोरोना मृत्यू प्रमाणपत्रावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारले


  • Marathi News
  • National
  • The Supreme Court Asked The Central Government On Corona’s Death Certificate News And Live Updates

Advertisement

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • न्यायालयाने 30 जूनला दिले होते निर्देश

सुप्रीम कोर्टाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या प्रमाणपत्राविषयी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत अनेक प्रश्नांचा भडिमार केला. कोर्टाने विचारणा केली, ‘कोरोनापीडित झाल्याने आत्महत्या करणाऱ्यांच्या मृत्यू प्रमाणपत्राचे काय होणारॽ केंद्राने आपल्या शपथपत्रात कोरोनाचा उल्लेख केला जाणार नसल्याचे म्हटले आहे. या मुद्द्यावर पुनर्विचार केला जावा.’ न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि ए. एस. बोपन्ना यांच्या पीठाने सोमवारी या प्रकरणाची सुनावणी केली.

Advertisement

सुनावणीदरम्यान कोर्टाने विचारणा केली की, ‘केंद्र सरकारने जाहीर केलेले धोरण राज्य सरकारे कसे लागू करणारॽ आधी जी प्रमाणपत्रे दिली आहेत त्यांचे काय होणारॽ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून लोकांच्या तक्रारीच्या निवारणासाठी समिती स्थापन करणार असे म्हटले आहे. या समित्यांची स्थापना कधी केली जाणारॽ मृतांचे दस्तऐवज कुटुंबीयांना द्यावे लागणार की रुग्णालये देतीलॽ’ कोर्टाने या सर्व प्रश्नांसह नवीन शपथपत्र दाखल करण्यास केंद्राला आदेश दिले आहेत.

न्यायालयाने ३० जूनला दिले होते निर्देश
सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. यात कोरोना महामारीत जीव गमावणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांनी नुकसान भरपाई आणि मृत्यूचे खरे कारण त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रात नोंदवले जाण्याबाबत सरकारला निर्देश देण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३० जून रोजी केंद्र सरकारला पीडितांसाठी भरपाई आणि मृत्यू प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यास सांगितले आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here