सुटीवर आलेल्या जवानाने गर्भवती पत्नी अन् मुलीची केली हत्या!: गाढ झोपेत असलेल्या दोघींचा गळा दाबला, अन् थेट पोलिस ठाणे गाठले

सुटीवर आलेल्या जवानाने गर्भवती पत्नी अन् मुलीची केली हत्या!: गाढ झोपेत असलेल्या दोघींचा गळा दाबला, अन् थेट पोलिस ठाणे गाठले


नांदेड2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

फोटोमध्ये सुरुवातीला मृत भाग्यश्री जायभाये, तर आरोपी पती आर्मीमॅन एकनाथ जायभाये दिसून येत आहे.

सुटीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाने आपल्या गरोदर पत्नी आणि 4 वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यातील बोरी (ता. कंधार) या गावात ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी पती स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन हजर झाला. एकनाथ जायभाये असे आरोपीचे नाव असून तो भारतीय सैन्यदलात राजस्थान येथे सद्या कार्यरत आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

हत्येनंतर थेट पोलिस ठाणे गाठले
आरोपी एकनाथ जायभाये याने आज बुधवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास पत्नी आणि 4 वर्षांची मुलगी सरस्वती दोघे झोपेत असताना त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. पत्नी भाग्यश्री ही आठ महिन्यांची गरोदर होती. हत्येनंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वतः माळाकोळी पोलिस ठाण्यात हजर झाला.

Advertisement

मुलगा का झाला नाही, सुरु होता तिचा छळ
आरोपी पती आर्मीमॅनने या घटनेची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. भाग्यश्री जायभाये यांचा विवाह 2019 साली एकनाथ जायभाये यांचा सोबत झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर मुलगा का झाला नाही असे म्हणत भाग्यश्रीला माहेरी जाऊन पैसे आण म्हणत तिचा छळ सुरू केला होता. तशी तक्रार भाग्यश्रीच्या आईने केली असल्याचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पत्नी-पत्नीचा वाद टोकाला, दोघांची आत्महत्या
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे धक्कादायक घटना समोर आली असून, पती-पत्नीमध्ये अचानक सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान आत्महत्येमध्ये झाले. ज्यात घरात पती-पत्नीने सोबतच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. राजू बंडू चव्हाण (वय 31 वर्षे) आणि सोनाली राजू चव्हाण (वय 27 ववर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नावं आहेत.

Advertisement

हे ही वाचा सविस्तर

संशयित राजस्थानचे, मास्टरमाईंड इगतपुरीचा!:उद्योजक हेमंत पारख यांच्या सिनेस्टाईल अपहरणाचा उलगडा; कारवाईतही पोलिसांचा थरार

Advertisement

नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, पारख यांना सुरतजवळ सोडल्यानंतर ते सुखरूप घरी आले. मात्र अपहरण केल्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कोटी रुपयांची खंडणी संशयितांनी वसूल केली. या प्रकरणी तपास सुरु असताना परराज्यातील सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने व थरार पद्धतीने अटक केली आहे. – येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Advertisement