सुख वार्ता: यूपीएससी नागरी सेवा परीक्षांत पुरुषांपेक्षा 24-25 वर्षीय मुली ठरताहेत सरस


Advertisement

जयपूर (दीपक आनंद)13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • देशात उच्च प्रशासकीय पदांवर निवडीत पुरुषांचे प्रमाण २०१९-२० मध्ये ३१.३%, महिलांचे प्रमाण राहिले ३५.८%

यूपीएससी-२०२१ च्या प्रिलिम्स पुढील महिन्यात होत आहेत. नागरी सेवा परीक्षांसाठी एकूण ६ संधी असतात. मात्र, या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये २४ ते २६ वयोगटातील मुलांचाच अधिक समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या ४ वर्षांत निवड झालेल्यांत या वयोगटातील महिलांची संख्या पुरुषांहून अधिक आहे. यूपीएससीच्या ताज्या अहवालानुसार, ३१.३ टक्के पुरुष आणि ३५.८ टक्के महिला उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, २०१५-१६ पासून २०१९-२०पर्यंतचा अहवाल पाहता उच्च पदांवर २४ ते २६ वयोगटातील महिला अधिकारीच अधिक निवडल्या गेल्या आहेत. या अहवालाचा सखोल अभ्यास केला तर लक्षात येते की, २१ ते २६ वर्षे वयोगटातही महिलांचे यश मिळवण्याचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा अधिक आहे. म्हणजे, जे तरुण-तरुणी प्रशासकीय सेवांसाठी निवडले गेले आहेत त्यात मुलींचे प्रमाणच अधिक आहे.

Advertisement

असाही एक कल: अॅटेम्प्ट वाढले तर यश मिळण्याची शक्यता कमी होत जाते गेल्या ४ वर्षांतील कल पाहता तिसऱ्या प्रयत्नांत (अॅटेम्प्ट) सर्वाधिक उमेदवार उत्तीर्ण होतात. एकूण २४.०२ टक्के उमेदवार तिसऱ्या प्रयत्नांत यशस्वी झाले. यात २२.९४% पुरुष आणि २७.४६% महिला होत्या. याच प्रकारे सहाव्या प्रयत्नात फक्त ८.३७% उमेदवार उत्तीर्ण होऊ शकले. यात ८.४०% पुरुष आणि ८.२९% महिला हाेत्या. अशा प्रकारे अॅटेम्प्ट वाढले की सोबत यशाची शक्यताही कमी होत जाते. ३० वर्षांहून अिधक वयाचे १,६१४ पुरुष उमेदवार मेन्सपर्यंत पोहोचले होते, तर या वयोगटातील महिला फक्त १३६ होत्या. यात ७७ पुरुष व १३ महिला निवडल्या गेल्या. पुरुषांचे यशाचे प्रमाण १२.४%, महिलांचे ६.७% राहिले. तज्ज्ञांनुसार, ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी बरीच वर्षे लागतात हा एक भ्रम आहे. कारण, आकडेवारी पाहता या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचा वयोगट अभ्यासला तर २६हून कमी वयाचेच अिधक आहेत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here