सीमा किणीकर यांचे प्रतिपादन: तळागाळातील महिला सक्षमीकरणा पासून वंचितच‎ ; महिला संघटनेतर्फे स्मरणिकेचे प्रकाशन‎


नाशिक‎2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

तळागाळातील महिला‎ सक्षमीकरणापासून अद्यापही वंचित‎ आहेत. अशा महिलांसाठी सर्व‎ स्तरावर अधिक काम करण्याची‎ गरज आहे, असे प्रतिपादन साेलापूर‎ येथील निरामय संस्थेच्या प्रमुख‎ सीमा किणीकर यांनी केले.‎ ‘मिळून साऱ्या जणी’ या महिला‎ संघटनेतर्फे आयाेजित स्मरणिका‎ प्रकाशनप्रसंगी त्या बाेलत हाेत्या.‎ प्रारंभी कलानंद नृत्य संस्थेच्या‎ विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.‎ त्यानंतर संघटनेच्या अध्यक्षा सीमा‎ शिंपी यांनी संस्थेची माहिती‎ दिली.पाहुण्यांचा परिचय प्राची‎ कुलकर्णी यांनी करून दिला.‎

Advertisement

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या‎ शीतल जगताप, संगीता जाधव व‎ ठिगळे यांना सत्कर करण्यात आला.‎ सीमा किणीकर यांच्या हस्ते‎ स्मरणिका प्रकाशन केल्यानंतर‎ त्यांची मुलाखत वृंदा लवटे यांनी‎ घेतली. एड‌्सग्रस्त महिला.‎ वेश्याव्यवसायातील महिलांसंबंधी‎ काम करताना आलेले विदारक‎ अनुभव किणीकर यांनी मांडले.‎ कार्यक्रमास निशिगंधा माेगल,‎ प्रभाताई कुलकर्णी, हिर कुलकर्णी,‎ माेना वैद्य, पद्मा साेनी, संगीता‎ अमृतकर, दीपाली कांगणे, रेवती‎ पारख आदी उपस्थित हाेते.‎ सूत्रसंचालन सरिता शिरुडे केले.‎ आभारप्रदर्शन संजीवनी कुलकर्णी‎ यांनी केले.‎

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement