सीबीआय रेड प्रकरण: समीर वानखेडे यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे  क्रांती रेडकर म्हणाली – कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास


मुंबई7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सीबीआयने याच प्रकरणात भ्रष्ट्राचाराबाबत गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

साक्षीदार के.पी गोसावी याचा आर्यन खानच्या कुटुंबीयांकडून २५ कोटी उकळण्याचा डाव होता, असा खुलासाही सीबीआयने समीर वानखेडे आणि इतरांविरोधात असलेल्या एफआयआरमध्ये नोंदवला आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ANI या वृत्तसंस्थेला महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

समीर वानखडेवरील आरोप चुकीचे – क्रांती रेडकर

Advertisement

समीर वानखेडे यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत, हे सर्वांना माहिती आहे. हे केवळ आरोप असून आम्ही सीबीआयला सहकार्य करत आहोत. कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहोत असे क्रांती रेडकर म्हणाली.

देशभक्त असल्याची शिक्षा!

Advertisement

​​​​​​​क्रांती रेडकर म्हणाले, सीबीआयने काल माझ्या निवासस्थानावर छापा टाकला. १२ तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. माझ्या घरातून त्यांना १८ हजार रुपये रोकड आणि मालमत्तेची ४ कागदपत्रं सापडली आहे. संबंधित मालमत्ता मी सेवेत रुजू होण्यापूर्वी विकत घेतली होती. मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे,” अशी प्रतिक्रिया अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली होती.

काय आहे प्रकरण?

Advertisement

२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर छापा टाकला होता. ड्रग्जप्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हा एनसीबी विभागाचे तत्कालिन संचालक समीर वानखेडे हे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवले होते. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती.

आर्यन खान प्रकरणी गंभीर आरोप

Advertisement

यानंतर आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची लाच मागण्यात आली होती. त्यातील आठ कोटी वानखेडे यांना देणार होतो, असे साईल यांनी सांगितलं होते. त्याची गंभीर दखल घेत एनसीबीच्या दक्षता विभागामार्फत समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचप्रकरणात सीबीआयने छापेमारी केली. तसंच, समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला.



Source link

Advertisement