सिन्नर-शिर्डी महामार्गावरील अपघाताचा मन हेलावून टाकणारा VIDEO: बसचा सांगाडाच बाहेर पडला, मृतांचे कपडे-वस्तु रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत


नाशिक7 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे येथे ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेचा एक मन हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आला असून यात अपघाताची विषन्नता दिसून येत आहे. अपघातातील मृतांचे कपडे व सामान यात रस्त्यावर विखुरलेले दिसत आहे. यात बसचा चुराडा झाला आहे. एका बाजूने बसचा सांगाडाच बाहेर पडल्याचे चित्र घटनास्थळावर दिसून आले.

Advertisement

मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस (क्रमांक एम एच 04 एसके 2751) व शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा माल ट्रक (क्रमांक एम एच 48 टी 1295) यांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. या अपघातात तब्बल 10 जण ठार झाले आहेत. तर 25 ते 30 जण गंभीर जखमी आहेत.

5 लाखांची मदत

Advertisement

गेल्या महिन्याभरात नाशिक परिसरातला हा आठवा अपघात असून अपघातांचे सत्र सुरूच आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळतात सिन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांच्या ओळख पटवण्याचे काम सुरू असून उर्वरित जखमी रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement