सिनेट बैठकीसाठी मागितली 10 फेब्रुवारीची परवानगी: नामनिर्देशन अद्यापही प्राप्त नाही


अमरावती8 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट (अधीसभा) बैठकीसाठी आता १० फेब्रुवारीची परवानगी मागण्यात आली आहे. तसे पत्र महामहीम राज्यपाल यांच्या राजभवनला पाठविण्यात आले असून त्यांच्या मान्यतेनंतरच ही बैठक आयोजित केली जाणार आहे. दरम्यान सिनेट आणि इतर प्राधिकारिणींवर नामनिर्देशित करावयाची नावे अद्यापही राज्यपालांचे कार्यालय अर्थात राजभवनकडून प्राप्त झाली नाहीत.

Advertisement

राज्यपालांच्या अखत्यारितील दहा आणि कुलगुरुंद्वारे नामित होणारी तीन अशी सिनेटची तेरा तसेच व्यवस्थापन परिषदेवर नामनिर्देशित केली जाणारी काही नावे राज्यपालांद्वारे निश्चित केली जातात. त्यासाठीची संभाव्य यादी कुलगुरुंमार्फत राजभवनला पाठविण्यात आली आहे. मात्र राज्यपालांनी त्यातील नेमक्या नावांवर अद्याप शिक्कामोर्तब केले नाही. त्यामुळेही सिनेट बैठकीच्या तारखेवर अनिश्चिततेचे सावट घोंघावत आहे. दरम्यान येत्या एक-दोन दिवसांत ही नावे विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त होतील. कदाचित या नावांसोबतच सिनेट बैठकीची तारीखही कळविली जाईल, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

नियमानुसार 20 दिवसांआधी सिनेट सदस्यांना बैठकीची सूचना कळवावी लागते. त्यामुळे येत्या तीन दिवसांत (20 जानेवारीपर्यंत) मान्यता मिळाली तरच 10 फेब्रुवारीला सिनेटची पहिली बैठक घेता येईल. नाहीतर गेल्यावेळी 30 जानेवारीचा मुहूर्त जसा टळला, तसाच प्रकार यावेळीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

सिनेटची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर महिण्यात घेण्यात आली. त्यामुळे नवनियुक्त सदस्यांना पहिल्या बैठकीची प्रतीक्षा लागली आहे. साधारणत: महिनाभराच्या आंत सिनेटची पहिली बैठक आयोजित केली जाण्याचा प्रघात आहे. परंतु यावर्षी तो प्रघात पाळला गेला नाही. त्यामुळे नवनियुक्त सदस्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून सर्वाधिक सदस्य निवडून आणणाऱ्या ‘नुटा’ संघटनेने थेट विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे.

… म्हणून बैठकीची गरज

Advertisement

मार्च महिना जवळ येत असल्याने विद्यापीठात सध्या अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. सदर अर्थसंकल्पाला सिनेटची मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे पहिली बैठक आयोजित करुन सिनेटचे रितसर गठन करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे. प्रशासनाची धडपडही त्यादृष्टीने सुरु आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement