सासूने पत्नीच्या पाया पडण्यास भाग पाडले: जावयाची गळफास लावून आत्महत्या, सासूसह दोन मेव्हुण्यांवर गुन्हा


नाशिक7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सासूने जावयाला सर्व नातेवाईक व ओळखीच्या लोकांसमोर पोलीस चौकी परिसरात बायकोच्या पाया पडण्यास भाग पाडल्याने अपमानाने व्यथीत होऊन जावयाने गळफास घेऊन जीवन संपवले. ही धक्कादायक घटना देवळाली गाव परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी संशयित सासू आणि तिच्या दोन मुलांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

नितीन सोहमपाल चटोले (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि तक्रारदार सोहमपाल चटोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दहा वर्षांपूर्वी कारगिल गेट, वडनेर येथील विमल सुभाष बिडलान यांच्या नेहा या मुलीसोबत विवाह झालेले आहे.

मुलगा नितीन चटोले (वय ३०) पत्नी व मुलांसोबत जयभवानीरोड येथे राहत होता. नेहाची आई विमल बिडलान, भाऊ विकी बिडलान व राहुल बिडलान लग्न झाल्यापासून नेहा व नितीनच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करत होते. वेगळे राहण्यास भाग पाडत होते. तेव्हापासून दोघे पती पत्नी वेगळे राहत होते.

Advertisement

दोघांमध्ये भांडण झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती. तीने पती च्या विरोधात महिला सुरक्षा विभागात तक्रार दिली होती. महिला सुरक्षा विभागातील अधिकाऱ्या समोर सासु विमलने जावई नितीनला “तू आणि तुझे खानदान आमच्या मुलीच्या लायकीचे नाही, तू तुझं काही पण कर, आम्ही आमच्या मुलींचे बघून घेऊ,” असे बोलुन नेहाला पुन्हा माहेरी नेले. तेव्हापासून नितीन नैराश्यामध्ये राहत होता.

पोलिस चौकीपर्यंत भांडण गेल्यानंतर संतापाच्या भरात नितीनने पत्नी नेहाला चापट मारली होती. त्याच्या विरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल होता. देवळालीगाव मधील सुंदरनगर पोलिस चौकी येथे नितीन, नेहा व दोघांचे नातेवाईक, ओळखीचे उपस्थित होते. यावेळी पुन्हा सासू विमलाने नितीनचा “तू माझ्या मुली सोबत राहण्याच्या लायकीचा नाही,” असे म्हणत जावयाला सर्वांसमोर नेहाच्या पाय पडायला लावले होते आणि सर्वांसमोर अपमान केला.

Advertisement

या अपमानाने व्यथीत होऊन सासू व मेहुण्याच्या छळाला कंटाळून नितीनने घरी दोरीच्या साह्याने छताच्या हुकला गळफास लावून घेत आत्महत्या केली. वरिष्ठ निरिक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement