सावधान, तुमच्याही मोबाईलमध्ये ‘हे’ अ‍ॅप असतील तर तात्काळ डिलीट करा, गुगलकडून कारवाई


गुगलने नुकतेच गुगल प्ले स्टोअरवरून काही अ‍ॅप्स हटवले आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून लॉगिन माहिती आणि वापरकर्त्यांच्या पेमेंटविषयी माहिती संकलित केली जात होती.

Advertisement

गुगलने नुकतेच गुगल प्ले स्टोअरवरून काही अ‍ॅप्स हटवले आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून लॉगिन माहिती आणि वापरकर्त्यांच्या पेमेंटविषयी माहिती संकलित केली जात होती. त्यामुळे तुमच्याही मोबाईलमध्ये संबंधित अ‍ॅप्स असतील तर तातडीने ते डिलीट करा. अन्यथा तुमच्याही माहितीची चोरी होऊ शकते. विशेष म्हणजे गुगलने याआधीही 150 अँड्रॉईड अ‍ॅप्‍सवर बंदी घातली होती. हे अ‍ॅप्स देखील वापरकर्त्यांसाठी धोक्याचे असल्याचं गुगलला लक्षात आलं होतं. हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटवल्यानं 3 बिलियन वापरकर्त्यांना मदत होईल, अशी माहिती गुगलने दिली होती.

गुगलने केलेल्या तपासात नव्यानं ३ अ‍ॅप्स वापरकर्त्यांसाठी धोकादायक असल्याचं समोर आलं. यानंतर हे अ‍ॅप्स तात्काळ हटवण्यात आले. हे अ‍ॅप वापरकर्त्यांची माहिती वापरत होते. या माहितीत व्यक्तिगत माहितीसोबतच आर्थिक व्यवहारांच्या माहितीचाही समावेश होता. या अ‍ॅपवर कोणत्याही परवानगी शिवाय माहितीच्या वापराची परवानगी दिली जाते. अनेक वेबसाईट्सवर फेसबुकच्या प्रोफाईलवरून लॉगिनचा पर्याय दिला जातो. यामुळे वापरकर्त्यांची पूर्ण माहिती त्यांच्याकडे जाते. यासाठी वापरकर्त्यांना अनेक प्रलोभनं दाखवली जातात.

Advertisement

गुगलने कोणते अ‍ॅप्स हटवले?

गुगलने प्‍ले स्‍टोअरवरून “मॅजिक फोटो लॅब – फोटो एडिटर”, “ब्लेंडर फोटो एडिटर-ईजी फोटो बॅकग्राउंड एडिटर” आणि “पिक्स फोटो मोशन एडिट 2021” आहे. हे सर्व अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलेत. त्यामुळे हे अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर तात्काळ डिलीट करा.

हेही वाचा : ऑगस्टमध्ये गुगलने भारतीय ९३,५५० Content काढून टाकला; जाणून घ्या काय आहे कारण

Advertisement

धोकादायक अ‍ॅप मोबाईलमधून कसे हटवणार?

ज्यांनी हे अ‍ॅप्स डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल केलेत ते मॅन्युअली अ‍ॅप हटवू शकतात. हे करताना तुमच्या फेसबुक लॉगिनशी संबंधित तपशील देखील बदलावे लागतील. याशिवाय विविध प्रलोभनं दाखवून मोबाईल डेटा वापराच्या वेगवेगळ्या परवानगी घेणारे अ‍ॅप डाऊनलोड करणं टाळा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here