सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसवणाऱ्यांवर कठोर कारवाई: नागपूर महापालिकेने केला 69 लाख 58 हजाराचा दंड केला वसूल


नागपूर21 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शहरातील सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ करून उपद्रव पसरविणाऱ्या विरोधात नागपूर महानगरपालिकेद्वारे कठोर कारवाई केली जात आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 च्या पंधरवड्यापर्यत महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून 69 लाख 58 हजाराचा दंड वसूल केला आहे.

Advertisement

शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंका तसेच रस्त्यावर वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांनावर नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 11 ऑक्टोबर ते 11 जानेवारी या दरम्यान उघड्यावर लघुशंका करणाऱ्या 158 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांकडून उपद्रव शोध पथकाद्वारे प्रत्येकी 500 रुपये दंड आकारण्यात येतो.

मागील चार महिन्यात 158 जणांकडून 79000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय रस्त्यावर वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणाऱ्या विरोधातही मनपाने कठोर पाऊले उचलली असून आजवर 17 जणांवर कारवाई करीत प्रत्येकी 1 हजार रुपये या प्रमाणे 17 हजार रुपये दंड वसूल केला आहे. दोन्ही कारवाईंमध्ये एकूण 96 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Advertisement

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 50 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी 11 ऑक्टोबरपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली असून 11 जानेवारी पर्यंत 14 हजार 413 प्रकरणाची नोंद करण्यात आली असून तब्बल ६९ लाख 58 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

नेहरूनगर झोनमध्ये लघुशंका सर्वाधिक

Advertisement

सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंका करीत परिसर अस्वच्छता पसरविणाऱ्या सर्वाधिक प्रकरणाची नोंद ही नेहरूनगर झोनमध्ये करण्यात आली आहे. 11 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या कारवाई नुसार आजवर नेहरूनगर झोनमध्ये 44 पेक्षा अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 22000 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर सर्वात कमी प्रकरणाची नोंद ही लक्ष्मीनगर झोन मध्ये करण्यात आली आहे.

लक्ष्मीनगर झोनमध्ये केवळ 4 प्रकरणाची नोंद असून, त्यांच्याकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापाठोपाठ सतरंजीपूरा झोनमध्ये 29 प्रकरणात 14 हजार 500, धरमपेठ झोनमध्ये 9 प्रकरणांत 4 हजार 500, हनुमाननगर झोनमध्ये 11 प्रकरणांत 5 हजार 500 रुपये, तसेच धंतोली झोनमध्ये 6 प्रकरणांत 3 हजार, गांधीबाग झोनमध्ये 18 प्रकरणांत 9 हजार, लकडगंज झोनमध्ये 16 प्रकरणांत 8 हजार, आशीनगर झोनमध्ये 11 प्रकरणांत 5 हजार 500, मंगळवारी झोनमध्ये 10 प्रकरणांत 5 हजार वसूल केले­­­­­­­­­­­­­­­­­­­.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement