सातारा हादरले: कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार, डोक्यात गोळी घालून युवकाचा खून


प्रतिनिधी | साताराएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गेल्या 24 तासांत सातारा शहरात 2 दहशतीच्या घटना घडल्याने हे शांतताप्रिय शहर हादरले आहे. काल रात्री कोयता गँगच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर काही तासांतच सातारा शहराजवळील वाढे फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये गोळीबार झाला.

Advertisement

मंगळवारी रात्री एक वाजता ही घटना घडली. गोळीबारमध्ये शुक्रवार पेठ येथील अमित भोसले हा युवक ठार झाला आहे. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या घटनांची गंभीर दखल घेतली असून तपास यंत्रणा अ‌ॅक्शन मोडवर आली आहे.

सातारा शहरानजीक असलेल्या महामार्गावरील वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेल परिसरात गोळीबार करुन एकाची हत्या करण्यात आली आहे. गोळीबारात अमित भोसले या युवकाच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गोळीबारानंतर मारेकरी फरार झाले आहेत.

Advertisement

हॉटेल व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण

गोळीबार झाल्याच्या थरारनंतर परिसरात खळबळ उडाली. वाढे फाट्यानजीक पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय चालतो. याच परिसरात हा गोळीबार झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या गोळीबारामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मृत्यू झालेला युवक सातारा शहरातील असून त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबियांनी, मित्रांनी धाव घेतली आहे. सातारा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

कोयता गँगची दहशत; पाचजण ताब्यात

Advertisement
कोयता नाचवत दहशत माजवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोयता नाचवत दहशत माजवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा पोवई नाक्यावर कोयता नाचवून दहशत माजविणार्‍या पाच जणांना सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. हा गुन्हा घडला ते ठिकाण महाराष्ट्राचे मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहे.

Advertisement

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, साताराच्या पोवई नाक्याजवळील सयाजीराव हायस्कूलसमोर काही युवक हातात कोयता घेवून तो नाचवित असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना तत्काळ ताब्यात घेतले, तर पळून जाणार्‍या इतर तिघांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पोवई नाक्यावर जेरबंद केले. सातारा शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाचही जणांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात नेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement