सातारा2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सोमनाथ मांढरे हे वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र आहेत. त्यांना लडाख येथे पहाटेपासून नेमणूक होती.यावेळी हवामानातील बदलामुळे त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला.त्यातच ते बेशुद्ध झाले .त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.याची माहिती काल सायंकाळी कुटूंबियांना कळविण्यात आली. देश सेवा करीत असताना अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीर मरण आले . वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना याबाबत माहिती मिळाली. आसले (ता वाई )येथील सोमनाथ मांढरे यांचे बंधू असलेले महेश मांढरे यांना याची माहिती कळविण्यात आली.
सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा व फक्त दहा महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव पहाटे दिल्ली येथे पोहोचले. आज सायंकाळ पर्यंत आसले या मूळ गावी पोहोचेल .त्यांच्यावर शासकीय इतमामात असले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.