सातारा26 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जेल फोडून जो इतिहास निर्माण केलेला आहे त्या इतिहासाला सातत्याने समोर ठेवून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मिळालेल्या स्वातंत्र्याचे सुराज्य निर्माण करण्याचे काम तरुण पिढीने केले पाहिजे यासाठीच आजचा शौर्य दिन साजरा करण्यात येतो असे प्रतिपादन हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव काका नायकवडी यांनी सातारा येथे बोलताना केले.
स्मृतीस्तंभास अभिवादनाचा कार्यक्रम
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी सातारा जेल फोडून दि. 10 सप्टेंबर 1944 रोजी बाहेर पडले. या घटनेला आज 79 वर्ष पूर्ण झालेबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाबाहेर स्वातंत्र्य चळवळीत बंदिवान असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीनिमित्त उभारलेल्या स्मृती स्तंभास अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी वैभवकाका नायकवडी बोलत होते. यावेळी शिराळा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब नायकवडी , सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप , वीरधवल नायकवडी केदार नायकवडी, भगवान पाटील आदी उपस्थित होते.
या मान्यवारांची होती उपस्थिती
वैभवकाका नायकवडी यांनी यावेळी बोलताना सांगितले की स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्न पूर्ण करणे हीच आज काळाची गरज आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा विजय असो , स्वातंत्र्यसैनिकांचा विजय असो , हुतात्मा किसन अहिर व हुतात्मा नानकसिंग यांचा विजय असो आदी घोषणांनी हा परिसर यावेळी दुमदुमून गेला होता. गणेश दुबळे यांनी आभार मानले. यावेळी गुट्टटांना बाबर , वाजे साहेब , दिनकर बाबर , विठ्ठल गुंजवटे , बाळासाहेब पाटील , प्रा डॉ भास्कर कदम , अस्लम तडसरकर , प्रा दत्ताजीराव जाधव , विजय निकम , गणेश कारंडे , आदी उपस्थित होते.