साकीनाका बलात्कार प्रकरण: ​​​​​​​पीडितेच्या मुलांची जबाबदारी सरकारने घेतली; मुख्यमंत्र्यांची घोषणा, 20 लाखांची आर्थिक मदतही


Advertisement

मुंबई3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • संपूर्ण प्रकरण काय?

साकीनाका अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबास २० लाखांची मदत आणि तिच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली अाहे. या प्रकरणात पीडित महिला विशिष्ट समाजाची असल्याने आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटीचे कलम लावण्यात आले आहे. या खटल्यासाठी प्रसिद्ध वकील राजा ठाकरेंची नियुक्ती करण्यात अाली आहे.

Advertisement

याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी मुंबईला भेट दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हलदार यांना चर्चेसाठी बोलावून घेतले. या वेळी पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. या परिवारास महिला बालकल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक साहाय्य तातडीने दिले जाईल.

तिच्या मुलांच्या शिक्षण व पालनपोषणातही संबंधित विभागांना वेगाने कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी हलदार यांना सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांना २० लाखांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

Advertisement

संपूर्ण प्रकरण काय?
साकीनाका येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने शहरातील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान प्राण सोडले आहे. पीडिता महिला 9 सप्टेंबरला साकीनाका परीसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. या घटनेत पीडित महिलेसोबत निर्भयासारखे व्यवहार झाल्याचे समोर आले होते.

या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री तीन वाजता घडली होती. आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवला होता. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी पीडित महिलेला खैरानी रस्त्यावरून उचलून आणले होते. पोलिसांनी आतापर्यंत सदरील प्रकरणात आरोपींना अटक केली आहे.

Advertisement

महिलेच्या खासगी अवयवात जखम
डॉक्टरांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या अंतर्गत भागात जखम झाली आहे. महिलेचे आॅपरेशन करण्यात आले असून तीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख मोहन चव्हाण अशी झाली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here